व्यसनांमुळे 36व्या वर्षांपासूनच वृद्धत्व येऊ शकेल?

    30-Jun-2025
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 
thoughts
व्यसनांचे दुष्परिणाम युवकांच्या लक्षात येत नाहीत काही जणांना तरुणपणी व्यसने लागतात. पण, त्याचा वाईट परिणाम लगेच दिसत नाही. त्यामुळे या सवयींमुळे शरीराचे नुकसान हाेते, हे युवकांच्या लक्षात येत नाही. सिगारेटने कॅन्सर हाेताे, दारू प्याल्याने लिव्हर खराब हाेते. बैठ्या जीवनशैलीमुळे म्हातारपण लवकर येते. शरीरावर वृद्धत्वाच्या खुणा लवकर दिसू लागतात, हे अनेक अभ्यास आणि संशाेधनात सिद्ध झाले आहे. युवकांना कितीही समजावून सांगितले, तरी ते लक्ष देत नाही. कारण त्यांना वाटते, की गेल्या दाेन-चार वर्षांपासून ते अशी जीवनशैली जगत आहेत, पण अजूनपर्यंत काहीच झालं नाही. यापुढेही हाेणार नाही. पुढचे पुढे बघता येईल.पण, हळूहळू काळ पुढे जाताे आणि त्यांच्या लक्षात येते, कव्यसनांनी आपले जीवन कसे संपवले आहे.
 
फिनलँडच्या संशाेधकांनी केला अभ्यास आता मात्र खडबडून जागे व्हावे, असे संशाेधन पुढे आले आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांमुळे व्यक्ती 36व्या वर्षांपासूनच वृद्ध दिसायला सुरुवात हाेते, असे या अभ्यासात म्हटले आहे. फिनलँडच्या संशाेधकांनी हा अभ्यास केला.अभ्यासामध्ये काय आढळले? फिनलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ज्यवास्किने हे संशाेधन केले. त्यासाठी फिनलँडमधील एका शहरातील सुमारे 370 रहिवाशांच्या आराेग्याचा डाटा गाेळा करण्यात आला. त्यामध्ये गेल्या 30 वर्षांतील त्यांचे आराेग्य, सवयी यांचा अभ्यास करण्यात आला. वयाच्या 27, 36, 42, 50 आणि 61 वर्षांच्या टप्प्यांवर त्यांचे आराेग्य कसे हाेते, याची मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्या माहितीचा आढावा घेण्यात आला.36व्या वर्षांपासून दिसू लागतात दुष्परिणाम आपले शरीर नैसर्गिकपणेच हीलिंग प्राेसेस करत असते. शरीरात कुठेही अडचण, गडबड असल्यास शक्य असेल ताेपर्यंत स्वतःहून सुधारणाकरण्यास सुरुवात करते.
 
पण, काही वयाेमर्यादेनंतर शरीराच्या या क्षमतेमध्ये घट व्हायला सुरुवात हाेते. यामुळे वाईट जीवनशैलीचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात हाेते.याविषयी डाॅ. एकता गाला यांनी सांगितले, की सामान्यपणे 30 वर्षांच्या वयानंतर शरीरातील विविध क्रिया-प्रक्रिया हळू हाेतात. आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता घटण्यास सुरुवात हाेते. रिपेअर आणि रिकव्हर हाेण्याची जी नैसर्गिक क्षमता असते, ती घटत जाते. म्हणून आपल्या वाईट सवयींचा परिणाम दिसण्यास सुरुवात हाेते.वयाबराेबरच शरीरामध्ये बाेन-मांसही कमी हाेते. याचा परिणाम म्हणून हाडं कमजाेर हाेतात.मांसपेशी कमजाेर हाेऊ लागतात. अशात जर तुम्ही युवावस्थेमध्येच व्यायामावर पुरेसे लक्ष दिले नसेल तर वयाच्या 30-35 वर्षांनंतर मांसपेशी आणि हाडे जलदपणे कमजाेर पडू लागतात.
 
व्यायामामुळे आपले वजन नियंत्रणात राहते, इन्श्युलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह हाेते. म्हणून डायबिटीजचा धाेकाही घटताे. व्यायामामुळे आपल्या हृदयाचे स्वास्थ्य देखील चांगले राहते.म्हणजेच व्यायाम तुमच्या संपूर्ण आराेग्याला चांगले ठेवण्याचे काम करताे. जर तारुण्यावस्थेतच व्यायामाकडे लक्ष दिले नाही तर मग विविध स्वास्थ्य-संबंधित समस्या सुरू हाेऊ लागतात.अशाच पद्धतीने, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लाेक दारू सहन करू शकत नाहीत.चयापचयाची क्षमता 36 वर्षांपासून घटते वय वर्ष 30-35च्या दरम्यान शरीर अद्याप वाढीच्या टप्प्यावर असते. या कारणामुळे शरीराचे मेटॅबाॅलिझम सुद्धा जलद असते. मेटॅबाॅलिझम म्हणजेच आहाराला ऊर्जेत रूपांतरित करण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया तीस वर्षांनंतर संथ पडू लागते. या कारणामुळे त्या नंतरच्या थाेड्याच वर्षांमध्ये दुष्परिणाम दिसण्यास सुरू हाेताे. वाढत्या वयाबराेबर मेटॅबाॅलिझम स्लाे झाल्याने बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये, लिव्हरमध्ये चरबी साठली जाते.
 
चरबी साठल्याने अल्काेहाेलला प्राेसेस करायला लिव्हरला वेळ लागताे. अशातच जर युवावस्थेतच दारू जास्त सेवन करत असाल तर लिव्हरची काम करण्याची क्षमता या काळानंतर जास्त तीव्र गतीने घटते. स्माेकिंगचेही असेच आहे. त्यात फुफ्फुस, हृदयाची काम करण्याची क्षमता 35 वर्षांपर्यंत पाेहचताच घटून जाते.व्यसनांचा दुष्परिणाम शरीर व मनावर या अभ्यासात दिसून आले, की जे लाेक दरराेज दारू पितात, सिगारेट ओढतात, व्यायाम करत नाहीत, त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य 36 वर्षांच्या वयापर्यंत बिघडू लागते.आणि वयाबराेबर ते जास्तच खराब हाेऊ लागते.अभ्यासकांचे मत आहे, की काेणताही व्यायाम न करता, सुस्त जीवन जगल्यास अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण हाेतात.अशाच प्रकारे धूम्रपानाचा प्रत्यक्ष परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही हाेताे. दारू प्याल्याने शरीर आणि मेंदू दाेन्हींवर वाईट परिणाम हाेताे.
 
अल्काेहाेल, स्माेकिंग सारख्या सवयी मानसिक स्वास्थ्यासाठी देखील चांगल्या नसतात. बरेच लाेक स्ट्रेस दूर करण्यासाठी सिगारेट, दारूचे सेवन करतात. पण, त्यामुळेच जास्त स्ट्रेस वाढताे. मानसिक स्वास्थ्य जाते. झाेपेचा पॅटर्न बिघडताे. स्मरणशक्तीवर दुष्परिणाम हाेताे. तसेच एन्गझायटी, डिप्रेशनही येऊ शकते.चांगल्या सवयी महत्त्वाच्या तेच जर आधी पासूनच पाैष्टिक अन्न घेणे, नियमित व्यायाम करणे या सवयी असतील, तसेच स्माेकिंग, अल्काेहाेलचे सेवन टाळले असेल तर अवयवांची काम करण्याची क्षमता जास्त प्रभावित हाेत नाही! वाईट सवयी लवकर साेडणे गरजेचे वयाची चाळिशी पार हाेण्याआधीच वाईट सवयींचे दुष्परिणाम शरीर-मनावर दिसतात. त्यामुळे या वाईट सवयी लवकर साेडणे गरजेचे आहे.
 
त्यामुळे शरीराचे जास्त नुकसान हाेण्यापासून वाचवता येईल. तसेच, हेल्दी लाइफस्टाइल स्वीकारून आपल्याला हृदयासंबंधित आजार, कॅन्सरचे धाेके कमी करता येतील. तसेच, वेळेआधी येणाऱ्या मृत्यूचे धाेकेही कमी हाेतील, असे या अभ्यासात सुचविण्यात आले आहे.फिनलँडच्या रिसर्चर्सनी केलेल्या या अभ्यासावरून दिसते, की शरीराने डॅमेजची लक्षणे दाखवण्याआधीच जागे व्हा, तर तुम्ही वाचू शकाल.लहान वयात ताप आला असेल तर रुग्ण त्यातून लवकर बरा हाेताे. तर, 40-45 वर्षांच्या वयात आलेल्या तापानंतर कमजाेरपणा जास्त जाणवताे. तर, 60-70 वर्षांच्या वयात आलेल्या थाेड्याशा कमी तापानंतरही शरीराचे जास्त नुकसान हाेते.या गाेष्टींवरून हे समजू शकते, की शरीराची नैसर्गिकदृष्ट्या तंदुरुस्त क्षमता असताना, स्माेकिंग, अल्काेहाेल, बैठे जीवन, अनिद्रा, जंक फूड यासारख्या वाईट सवयी साेडणे आवश्यक आहे. 36 वर्षांनंतर डॅमेज सुरू झाल्यानंतर आराेग्याच्या गाडीला रिव्हर्स करणे अवघड हाेते!