फाेटाे काढण्यासाठी रडणाऱ्या मुलाला सिंहाच्या पाठीवर बसवल

30 Jun 2025 11:40:01
 
 
lion
 
साेशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.त्यात एक वडील आपल्या तीनचार वर्षांच्या मुलाला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलगा खूप घाबरताे आणि रडताेही, पण वडिलांना अजूनही सिंहावर बसलेल्या मुलाचा फाेटाे काढायचा आहे. तथापि, मुलाच्या रडण्याच्या आवाजाने चिडलेला सिंह उठताे आणि पळून जाताे. यानंतर बाप ताे घाबरताे आणि आपल्या मुलाला घेऊन जाताे. हा व्हिडिओ जुना असला तरी पालकत्वाबाबत ताे पुन्हा व्हायरल झाला आहे. पालक आपल्या मुलांचा जीव धाेक्यात घालताना काेणत्या चुका करतात हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पाेस्ट केला आहे. ही घटना काेणत्याप्राणीसंग्रहालयातील आहे हे माहीत नाही, परंतु व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लाेक म्हणत आहेत की या वडिलांना तुरुंगात टाकले पाहिजे.
Powered By Sangraha 9.0