या आजारात राेग्याने पूर्ण आराम करायला हवा. आहारात दलिया आणि खिचडी तसेच फळांचा ज्यूस यांचा समावेश असावा. मसालेदार, तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. राेग्याला पाणी उकळून गार गेलेले द्यायला हवे.डाेळ्यांचे आजार पावसाळ्यात डाेळ्यांचे सुद्धा अनेक प्रकारचे राेग हाेऊ शकतात.जसे आय फ्लू म्हणजे डाेळे येणे इत्यादी. त्यामुळे डाेळे लाल हाेतात.सूज आल्यामुळे डाेळ्यांमध्ये वेदनाही हाेतात. यापासून वाचण्यासाठी स्वच्छ हातांनीच डाेळ्यांना स्वच्छ करणे आवश्यक आहे. आपल्या स्वत:च्या टाॅवेलनेच शरीर पुसावे.
डाेळ्यांना दिवसातून3 ते 4 वेळा पाण्याने धुवायला हवे. जर तरीही डाेळ्यांचा हा आजार बरा झाला नाही तर डाॅ्नटरांना त्वरित दाखवावे.फूड पाॅइझनिंग हे दूषित अन्न खाल्ल्याने हाेते.या आजारात थंडी वाजणे, पाेटदुखी, उलटी आणि ताप येणे इत्यादी मुख्य लक्षणे दिसून येतात. अशा स्थितीत ग्लुकाेजचे पाणी, लिंबाचे सरबत, सूप आणि पाणी यांचे जास्तीत जास्त सेवन करायला हवे. या आजारापासून वाचण्यासाठी स्वच्छ आणि ताजे अन्नच खावे. स्वच्छ भांड्यात अन्न ठेवून मग खावे.