फसवणूक राेखण्यासाठी आरबीआय ‘रीअल-टाइम माॅनिटरिंग’ प्लॅटफाॅर्म सुरू करणार

30 Jun 2025 11:46:09
 


RBI
 
 
 
डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली एक नवीन प्लॅटफाॅर्म विकसित केला जात आहे.त्याला डिजिटल पेमेंट इंटेलिजेंस प्लॅटफाॅर्म (ऊझखझ) असे म्हटले जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत प्रमुख सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांचा समावेश करण्यात आला आहे. हे व्यासपीठ डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून विकसित केले जाईल.त्याचा उद्देश फसवणूक राेखणे आणि डिजिटल व्यवहारांमध्ये जाेखीम व्यवस्थापन सुधारणे आहे. या प्लॅटफाॅर्मद्वारे, फसवणुकीशी संबंधित माहिती रीअल टाइममध्ये शेअर केली जाऊ शकते, ज्यामुळे वेळेवर फसवे व्यवहार राेखता येतील.
 
आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्रितपणे एक नवीन डिजिटल प्लॅटफाॅर्म सुरू करण्याची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफाॅर्मची संस्थात्मक रचना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या मदतीने तयार केली जाईल.हा मुद्दा सरकार आणि रिझर्व्ह बँक दाेघांसाठीही प्राधान्याचा आहे. जेव्हा हे प्लॅटफाॅर्म पूर्णपणे कार्यरत हाेईल, तेव्हा ते विविध स्राेतांकडून डेटा गाेळा करेल आणि त्याचे विश्लेषण करेल, जेणेकरून काेणतेही संभाव्य धाेके किंवा फसवणूक ओळखता येईल. हप्लॅटफाॅर्म रीअल-टाइममध्ये डेटा शेअर करेल, ज्यामुळे फसवणूक टाळता येईल आणि व्यवहार सुरक्षित हाेतील.
 
रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात बँकांमध्ये फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये माेठी वाढ झाली आहे. या कालावधीत, फसवणुकीत गुंतलेली एकूण रक्कम जवळजवळ तिप्पट वाढून 36,014 काेटी रुपये हाेते, तर गेल्या वर्षी ते 12,230 काेटी रुपये हाेते.खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये, बहुतेक फसवणुकीची प्रकरणे कार्ड आणि इंटरनेटशी संबंधित आहेत, तर सरकारी बँकांमध्ये, बहुतेक फसवणुकीची प्रकरणे कर्जांशी संबंधित आहेत.
Powered By Sangraha 9.0