गुडघेदुखीची कारणे आणि उपचार वांढत्या वयाबराेबर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, वेगाने चालणे, जिने पुन्हा पुन्हा वेगाने चढणे आणि उतरणे, झटका देऊन बसणे आणि उठणे यामुळे अनेक वेळा गुडघेदुखी सुरू हाेते.जर आपण याकडे सुरुवातीलाच लक्ष दिले नाही तर वेदना जास्त वाढतात. अशा स्थितीत सर्वात चांगला इलाज आहे, आराम करा आणि डाॅ्नटरांच्या सल्ल्यानुसार पेन किलर घ्या.निराेगी अवस्थेत गुडघे हलवित राहा आणि चालत राहा. तरच गुडघे निराेगी राहतील. त्यासाठी याेग, फेरफटका मारणे, सायकल चालविणे आणि पाेहाेणे असे व्यायाम निराेगी असताना करत राहा.
जर कधी वेदना अचानक जास्त झाल्या आणि डाॅ्नटरांकडे जाणे श्नय नसेल, तर क्राेसिन किंवा इतर काेणते तरी पेन किलर जे तुम्हाला याेग्य वाटत असेल ते घ्या. त्याशिवाय डाॅ्नटरांनी सांगितलेल्या आर. आय.सी.ई.फाॅर्म्युलाचा वापर करा.आर म्हणजे रेस्ट, आय म्हणजे बर्फाचा शेक घेणे (आईस), सी म्हणजे काँप्रेशन (म्हणजे क्रेब बँडेज, नी कॅप वापरा). लक्षात ठेवा, नी कॅप आणि क्रेब बँडेज खूप जास्त टाइट बांधू नका आणि खूप जास्त ढिल्लेही बांधू नका. ई म्हणजे एलीव्हेशन म्हणजे पायांच्या खाली उशी ठेवून पाय आणि गुडघे थाेडे वर ठेवा.
या दिवसांमध्ये काेणताही व्यायाम करू नका.वेदनाशामक बाम किंवा जेल हल्नया हातांनी दुखणाऱ्या भागावरलावा. पूर्ण आराम करा. तरीही जर दाेन-चार दिवसांत आराम वाटला नाही, तर डाॅ्नटरांशी संपर्क साधा. कधी कधी स्नायूंमध्ये आलेल्या कमकुवतपणाने सुद्धा वेदना जास्त दिवस चालू राहतात.जर दुखण्याचे कारण काेणती जखम नसेल, पण गुडघ्याच्या आजूबाजूला सूज असेल, तसेच वेदनारात्री वाढत असतील, तर काही इन्फे्नशन किंवा संधिवात असू शकताे. त्यामुळे तज्ज्ञांना भेटा.
वेदना हाेत असल्यास सावधगिरी बाळगा
* जमिनीवर बसू नका. त्यामुळे वेदना वाढतात.
* एकाच पायावर वजन टाकू नका. सातत्याने उभे राहू नका.एकाच स्थितीत जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे ठीक नाही.
* गुडघे वाकवून बसू नका.