देवाकडे सतत मागण्यापेक्षा मानूयात

03 Jun 2025 23:03:31
 
 


thoughts 
 
 
आभार लागतात. व्हिसा मिळाल्यास मी तुला थाळी दाखवील, नाेकरी मिळाल्यास तुझ्या मंदिराच्या कळसावर ध्वज चढवेल, निवडणुकीचे तिकीट मिळाल्यास दरगाहवर चादर चढवेल, चर्चमध्ये सर्व्हिस देईल, कँडल लावेल किंवा गुरुद्वारामध्ये येऊन सेवा देईल... ‘आधी तु दे, मग मी देताे’ या वृत्तीनेच ईश्वराशी संबंध ठेवला जाताे.बिनचूक हिशाेब आपली अडचण ही आहे की, समग्र जगाला चालविणाऱ्या शक्तीबराेबर आपण साैदेबाजी करताे आणि खूश हाेऊन जाताे.आश्चर्याची गाेष्ट म्हणजे आपले काम झाल्यावर सबंध गावामध्ये दवंडी पिटवताे आणि जाऊन ईश्वराला म्हणताे की, ‘बघ! तू माझे काम करून दिले, म्हणून मी आता तुझे काम करत आहे.’ आपला हिशेब आता बिनचूक झाला.
 
ईश्वराशी गप्पा मारून तर पाहा ईश्वराबराेबर कारणाशिवाय गप्पा मारून तर पाहा, त्याचे फक्त आभार मानण्यासाठी त्याच्याकडे जाऊन तर बघा, जाऊनत्याच्याशी बाेलावे की तू मला खूप दिलं आहेस, मी तुला जे मागितले नव्हते ते देखील तू मला दिलेस. पण, आपण हे करतच नाही! एक चांगली लाेककथा आहे. एके काळी एका गावात दाेन खेडूत राहत हाेते. दाेघे फारच गरीब हाेते. दाेघांकडे छाेटेसे शेत हाेते. ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत.एके रात्री दाेघांचा साप चावून मृत्यू झाला.ते देवाकडे गेले.
देवाने एका शेतकऱ्याला विचारले की तुझ्या आयुष्यात काय हाेते? त्या शेतकऱ्याने म्हटले, ‘देवाने आम्हाला फारच गरीब बनवले हाेते. छाेटेसे शेत हाेते. त्यावर कुटुंबाचे कसेबसे भागत हाेते. चांगले कपडे घालणे किंवा नवे घर घेणेही शक्य नव्हते.’ देवाने स्मित केले आणि विचारले, आता नव्या जन्मात तुला काय हवे आहे?
 
ताे म्हणाला, ‘मला चहूबाजूंनी धन मिळेल असे काही तरी करून दे! मला कुणाला द्यायला नकाे. पण, लाेकांनीच मला दिले पाहिजे.’ देव म्हणाले, ठीक आहे.आणि त्याला पाठवून दिले.दुसऱ्या शेतकऱ्याला विचारले. त्याने म्हटले, ‘देवा तुम्ही मला आयुष्यात खूप दिले हाेते. एक चांगले घर, चांगले शेत, चांगली पत्नी आणि मुले. शेतात कष्ट करून आम्ही जे मिळवत असू, त्यात आनंदाने जीवन व्यतीत करीत हाेताे. असे असूनही मला एक वेदना सतावत आहे. माझ्या घरी जेव्हा एखादा भिक्षुक किंवा मागणारा येत असे, तेव्हा त्याला भाेजन देऊ शकत नव्हताे. आमच्याकडे दान करण्यासारखे काहीच नव्हते.’ देवाने स्मित करून विचारले, ‘पुढच्या जन्मी काय पाहिजे?’ ताे म्हणाला, ‘देवा, तुम्ही मला जे द्याल ते तुमच्या शक्तीनुसार आणि माझ्या याेग्यते प्रमाणेच द्याल, याचा मला विश्वास आहे.
 
जर माझ्या म्हणण्याप्रमाणे काही द्यायचेच असेल, तर असे द्या की माझ्या घरातून कुणी भिक्षू किंवा मागणारा रिकाम्या पाेटी जाणार नाही. मी त्याची सेवा करू शकेल.’ देव म्हणाला, ठीक आहे.थाेड्या काळाने दाेन्ही शेतकऱ्यांनी एकाच गावात जन्म घेतला. आधीचा शेतकरी, ज्याला सगळ्यांकडून पाहिजे हाेते, ताे एक भिक्षू बनला. ताे चहूबाजूंना फिरून फक्त मागतच हाेता आणि लाेक त्याला देत हाेते. दुसरा शेतकरी गावातील पाटलाचा मुलगा बनला आणि पुढे जाऊन ताे सरपंच झाला.ईश्वराकडे काय मागावे आणि काय मागू नये त्यातील हा फरक आहे.स्वतःचे कष्ट व ईश्वरावरील श्रद्धा दाेन्ही महत्त्वाचे अनेक जण असे समजतात की, संपूर्ण जगाचे संचालन करणारा लहानसहान वस्तू देत फिरत आहे. वास्तविक पाहता आपण स्वतःच कष्ट करून आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून पुढे चालायचे असते.
 
अशा तऱ्हेने काम केल्यास यश मिळतेच. पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्यास, पुन्हा प्रयत्न केले जातात.कष्टामुळे यश मिळतेच.ईश्वर कृपा, ईश्वर इच्छा समजली पाहिजे एकच गाेष्ट आहे की आपण ईश्वर कृपा आणि ईश्वर इच्छेला समजले पाहिजे. आपल्याला जे हवे, ते मिळाले तर ती ईश्वरी कृपा असते. आणि आपल्याला जे हवे, ते झाले नाही तर, ती ईश्वरी इच्छा असते, हा भेद समजला पाहिजे.तुमच्या आराध्य देवतेकडे जाऊन शांतपणे कधी बाेलता? मंदिर, मस्जिद, चर्च, अग्यारी किंवा गुरुद्वारामध्ये जाऊन शांतपणे बसला आहात. ईश्वराकडे मागण्याऐवजी कधीतरी त्याच्याशी बातचीत केली आहे, असे तुम्हाला आठवते का?
 
मला घर घेऊन दे, मला गाडी घेऊन दे, मला नाेकरी मिळवून दे, मला काॅन्ट्रॅक्ट घेऊन दे, मला निवडणुकीमध्ये विजय मिळवून दे की मग दुसरे काहीही असाे, अनेक जण केवळ मागण्यासाठीच प्रार्थनास्थळी जातात.देवापुढेही व्हीव्हीआयपी कल्चर आता तर देवदर्शनातही व्हीव्हीआयपी कल्चर आले आहे. स्पेशल मीटिंगसाठी पैसा द्यावा लागताे. कुठे बंद दरवाजा आड देव-घेव हाेते. तर कुठे खुलेआम पैसे भरून व्हीआयपी लाइन लागते. कुठे ओळखीमुळे आत जाऊ दिले जाते, तर कुठे दबावामुळे व्हीआयपी म्हणून दर्शन घेऊ दिले जाते. या सगळ्यामागेच एकच हेतू असताे, की, ‘हे ईश्वरा मला हे दे, ते दे!’ विना संकाेच साैदेबाजी अनेकजण देवाशी साैदेबाजी करण्यात जराही संकाेच करत नाही. श्रद्धा आणि विश्वासाच्या नावावर बार्टर - साैदेबाजी करू
Powered By Sangraha 9.0