रडका सिनेमा : दूर अ‍ॅवाॅर्ड की छाँव में

    03-Jun-2025
Total Views |
 
 

movie 
 
किशाेर कुमार हा पडद्यावरचा विनाेदी अभिनेता. त्याला पाहिलं की लाेकांना हसू यायचं. ताे वास्तव आयुष्यातही अनेकदा विदूषकगिरी करायचा, चक्रमासारखं वागायचा. पण मनात खाेलवर कसलं तरी दु:ख हाेतं. ताे स्वत: सिनेमे बनवायचा तेव्हा ते त्याच्या एकंदर प्रतिमेशी विसंगत असायचे. दूर गगन की छाँव में हा सिनेमा त्याने बनवला त्याआधी अनेक वेळा सत्यजित राय यांचा पाथेर पांचाली पाहिला हाेता. या कलात्मक बंगाली सिनेमाने भारतीय सिनेमाचा झेंडा खऱ्या अर्थाने परदेशांत नेला हाेता. त्या सिनेमाच्या प्रभावातून त्याने युद्धावरून परतणाऱ्या सैनिकाची आणि त्याच्या मूकबधिर मुलाची कथा या सिनेमातून मांडली.
 
हा संथगतीचा, रडका सिनेमा अजिबात चालणा नाही, या कल्पनेने त्याला जेमतेम एक थिएटर मिळालं मुंबईत. पण, सिनेमा धाे धाे चालू लागला. ताे यशस्वी ठरला. त्या काळात किशाेरला दिल्लीतून एक फाेन आला.तुमच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकताे, फक्त थाेडा खर्च करायची तयारी ठेवा. किशाेरने ही ऑफर धुडकावली. अर्थातच त्याला पुरस्कार मिळाला नाही. मात्र, गंमत अशी की दक्षिणेत रामू या नावाने या सिनेमाचा तामिळ रिमेक सुपरस्टार जेमिनी गणेशनला घेऊन केला गेला. ताे सुपरहिट तर झालाच, पण त्याला सर्वाेत्कृष्ट तामिळ सिनेमाचं राष्ट्रीय पारिताेषिकही मिळालं.