भव्यदिव्य आणि स्मरणीय असाच सिंहस्थ कुंभमेळा हाेणार

03 Jun 2025 22:54:36
 
 

CM 
 
कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात हाेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वताेपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या साेयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल.कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे जग स्तिमित हाेईल असे भव्यदिव्य आणि स्मरणीय आयाेजन सर्वांच्या सहकार्याने करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे हाेणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृतस्नानाचे दिवसही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सर्वश्री डाॅ.राहुल आहेर, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयु्नत मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. गाेदावरी निर्मळ आणि कायम प्रवाही राहावी, हेच कुंभाचे उद्दिष्ट असून, तसा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साधू-महंतांच्या सूचना लक्षात घेऊन शासन आवश्यक नियाेजन करेल.आखाड्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
 
साधुग्रामची जागा कायमस्वरूपी उपयाेगात यावी यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी शहरात रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे.कुशावर्तावर गर्दी हाेऊ नये यासाठी याेग्य नियाेजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विभागीय आयु्नतांनी प्रास्ताविक केले. विविध आखाड्यांच्या साधू- महंतांनी कुंभमेळा आयाेजनाबाबत सूचना केल्या. प्रारंभी सर्व साधू-महंतांनी मुख्यमंत्र्यांचे मंत्राेच्चारात स्वागत केले; तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व साधू-महंतांचे राज्य शासनातर्फे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0