त्वचेला सतेज बनविणारे कुमकुमादि तेल काय आहे?

29 Jun 2025 16:39:37
 

Health 
 
स्किनकेअरसाठी केमिकलयुक्त प्राॅडक्ट्स ऐवजी नॅचरल इंग्रिडीअंट्सचा वापर वाढत राहिला आहे आणि यामध्ये कुमकुमादि तेलाचा समावेश हाेताे. आयुर्वेदामध्ये अनेक वर्षांपासून या तेलाचा वापर त्वचेच्या उपचारांसाठी करण्यात येताेय. तेव्हा आता त्याचा वापर स्किनकेअरमध्ये वाढत चालला आहे.आयर्वेदामध्ये केसरला कुमकुम म्हटले जाते.आणि या तेलाचा मुख्य घटक केसर असल्यामुळे त्याचे नाव कुमकुमादि पडले आहे. केसराबराेबर चंदन आणि इतर जडीबुटींच्या संयाेजनामुळे बनलेले हे हर्बल ऑईल चेहऱ्यावर लावल्याने नैसर्गिक तजेला येताे.
 
कुमकुमादि तेल नियमित लावल्याने डार्क स्पाॅट्स, डाग आणि त्वचेचा रंगभेद दूर हाेऊन एकाच टाेनला राखण्यासाठी मदत करते. या तेलात अ‍ॅन्टीसेप्टिक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुण असल्याने ते बॅक्टेरियांपासून रक्षण देते आणि स्किनला क्लीन आणि फ्रेश करते. या बराेबर त्याच्यात असलेले अ‍ॅन्टीएजिंगचे गुण स्किनला यंग ठेवण्यात सहाय्य करते. ज्यांची स्किन ड्राय असते त्यांच्यासाठी कुमकुमादि तेल सगळ्यांत उत्तम समजले जाते. ते ड्राय स्किनला हायड्रेशनपुरते पाडून तिला मुलायम बनवते. त्याच्यात पित्तनाशक गुण असल्यामुळे त्वचे संबंधित विविध प्रकारचे प्राॅब्लेम्स दूर करण्यास उपयुक्त आहे.
 
घरी कसे बनवाल? कुमकुमादी तेलाला घरी बनवण्यासाठी एक ग्रॅम केसर, एक चमचा गरम दूध, एक माेठा चमचा चंदन पावडर, एक माेठा चमचा मंजिष्ठा पावडर, अर्घ्या चमचा खस पावडर, अर्धा कप बदाम आणि अर्धा कप तीळ तेल घ्यावे. तेल बनविण्यासाठी सगळ्यात आधी एक चमचा गरम दुधामध्ये केसरला थाेडा वेळ भजवत ठेवावे. त्यानंतर एका वाटीमध्ये सगळ्या पावडरला मिक्स करून घ्यावे. नंतर एका पॅनमध्ये बदाम आणि तिळाच्या तेलांना थाेडेसे काेमट गरम करून मिक्स केलेल्या पावडरला टाकून हलक्या तापमानात हलवते ठेवणे.पावडर तेलामध्ये बराेबर मिक्स हाेऊन जाईल तेव्हा केशरयुक्त दुधाला त्यात टाकून द्याव
Powered By Sangraha 9.0