महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिकाच्या दाेन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनात झाले.ही पुस्तिका राज्य प्रशासनासाठी अभूतपूर्व व महत्त्वपूर्ण पाऊल असून, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कर्मयाेगी भारत या उपक्रमाला बळ देणारी आहे, असे सांगून अधिकर्त्यांबराेबरच नागरिकांनाही ती मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव डाॅ.श्रीकर परदेशी, काेकण विभागीय आयु्नत डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व इतर महसूल अधिकाऱ्यांना विविध कामे करताना सुलभतेसाठी कायदे व नियम यासंदर्भातील हँडबुक तयार करण्याचा निर्णय बावनकुळे यांनी घेतला हाेता. त्यानुसार महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली काेकण विभागीय आयुक्त डाॅ. सूर्यवंशी यांच्यासह जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे तसेच काेकण विभागाचे सहायक आयु्नत रवींद्र पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मुख्यमंत्री, तसेच बावनकुळे यांनी या हस्तपुस्तिकांच्या कामाचे काैतुक केले.या दाेन खंडांमध्ये महसुली कामे (खंड 1) आणि बिगर महसुली कामे (खंड 2) यांचा समावेश असून एकूण 24 प्रकरणे असल्याची माहिती डाॅ. सूर्यवंशी यांनी दिली.