गेल्या काही महिन्यांतील दहशतवादी हल्ले, विमान अपघात, युद्धजन्य परिस्थिती यांसारख्या घटनांमुळे अनेक भारतीयांनी त्यांच्या वारसाहक्काच्या नाेंदणी विषयात गांभीर्याने लक्ष घातले आहे.पहलगाम दहशतवादी हल्ला व लंडनला जाणाऱ्या बाेईंग 787 ड्रीमलाइनरच्या अपघातानंतर वकिलांच्या मते विल किंवा इच्छापत्र तयार करण्यासाठी कायदेशीर सल्ल्यांची मागणी, ही काेविड महामारीनंतर सर्वाधिक वाढली आहे.कायदेतज्ज्ञांची मते : पूर्वी ही प्रक्रिया निवृत्तीनंतरच विचारात घेतलीजायची. मात्र आता अनेक तरुण, विशेषतः प्रवास करणारे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे यामध्येही आपली संपत्ती आणि नावे सुरक्षित राहण्यासाठी ‘विल’ करण्याची गंभीरता दिसून येत आहे.
अनेक कायदेतज्ज्ञ सांगतात, की वारसाहक्क या विषयात स्पष्टता नसल्याने, अशा कुटुंबांमध्ये आर्थिक आणि कायदेशीर अडचणी येतात.मृत्यूपश्चात काय हाेईल यावर लाेकांमध्ये आता चर्चा वाढत चालली आहे. ज्यांची मालकी आहे, त्यांची नाेंदणीकृत इच्छापत्रे व त्यासाेबत संपत्तीच्या वाटणीचे तपशील, याकडे अनेकांचा कल वाढला आहे,’ पल्लवी प्रताप (कायदे कंपनीच्या भागीदार) ‘प्रत्येक वेळी, जेव्हा एखादा गंभीर अपघात हाेताे किंवा ‘उच्च-प्राेफाईल’ प्रकरणात काेणाचा मृत्यू हाेताे, तेव्हा सामान्य व्यक्तींनाही आपल्या संपत्ती वाटपाची याेजना तयार करावी वाटते,’ अॅडव्हाेकेट अजाॅय खाटलावाला सांगतात. तरुण पिढीही सजग : काही वर्षां पूर्वीपर्यंत वयाच्या साठीनंतर इच्छापत्रे, या विषयाकडे लक्ष दिले जात असे.
परंतु, आता 30 आणि 40 वयातील व्यक्तीही अधिक सजगपणे विल आणि संपत्ती व्यवस्थापन करायला सुरुवात करत आहेत.
आर्थिक विषयांबद्दल साक्षरता आणि जीवनाच्या अस्थिरतेची जाणीव, या नव्या पिढीमध्ये अधिक आहे.‘पूर्वी लाेक म्हणायचे मला काही हाेणार नाही, पण आता अलीकडील घटनांमुळे लाेकांना वास्तवाची जाणीव हाेऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी अशा विषयांवर चर्चाही व्ह्यायची नाही, सध्या मात्र हे विषय प्राधान्याने घेतले जातात.अशा सल्ल्यांची मागणी वर्षभरात 20% ने वाढली आहे,’ कायदेविषयक संस्थेचे निखिल वर्गीस यांनी सांगितले. ‘आज साधारणतः आमचे 25% ग्राहक हे 40 वर्षांखालील आहेत. जाेडपी एकत्र येऊन कायदेशीर सल्ला घेत आहेत.