जगाच्या अनेक भागांत युद्ध आणि संघर्षाचे सावट आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासकेंद्रित वाटचाल करत असून, राज्यात आपण औद्याेगिक वाढ आणि आर्थिक प्रगतीवर संवाद करत आहाेत, ही प्रशंसनीय बाब आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पुढाकाराने बीकेसीत आयाेजित महाराष्ट्र उद्याेग संवाद-2025 या औद्याेगिक परिसंवादाचे उद्घाटन करताना राज्यपाल बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्याेग मंत्री उदय सामंत, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्याेग सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, देशभरातील उद्याेजक; तसेच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. यावेळी राज्यपालांनी राज्याच्या औद्याेगिक प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे गेल्या 10 वर्षांत राज्याने विविध क्षेत्रांत झेप घेतली आहे. विकसित भारत-विकसित महाराष्ट्र या लक्ष्यासाठी नेहमीच पुढे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. महाराष्ट्र, मुंबई केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर देशाला औद्याेगिक प्रेरणा देणारे बलशाली राज्य आहे. येथे गुंतवणुकीचअमर्याद शक्यता आहे. राज्याने गेल्या काही वर्षांत अनेक विक्रमी सामंजस्य करार केले असून, त्यांचे प्रत्यक्षात रूपांतरही देशात सर्वाधिक प्रमाणात झाले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.गेल्या वर्षी दावाेस येथे झालेल्या परिषदेतून राज्यात एकूण 15.72 लाख काेटींची परदेशी गुंतवणूक आली असून, या कालावधीत 80 ट्न्नयांहून अधिक प्रकल्प प्रत्यक्षात उतरले आहेत.दावाेसमध्ये करण्यात आलेल्या 46 सामंजस्य करारांपैकी 20 उद्याेगांना जागा देण्यात आली असून, आणखी 8 उद्याेजकांना लवकरच जागा मिळणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सामंत व रावल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि नॅसकाॅम; तसेच एमएसएसआयडीसी आणि नॅसकाॅम यांच्यात सांमजस्य करार झाले.