आपल्या शेजारी असलेल्या ब्रह्मदेशात श्वेग्यिन जिल्ह्यामध्ये ‘्नयाइक तियाे’ नावाचे एक बाैद्ध मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, ते समुद्रपातळीपासून 1,200 मीटर उंचीवर एका अशा खडकावर उभे आहे, जाे खडक अगदी नाजूकपणे पर्वतावर टिकून आहे. या मंदिरात गाैतम बुद्ध यांचा एक कक्ष ठेवण्यात आला असून, त्याच्या प्रभावानेच या विशाल खडकाचा ताेल कायम आहे, असे तिथले लाेक मानतात.दाेरीच्या शिडीने वर्षातून एकच दिवस या मंदिरात जाता येते असा स्थानिक लाेकांचा समज आहे. यादिवशी अनेक बाैद्ध लाेक या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात. जर काेणी सतत तीन वेळा मंदिरात गेला तर त्याच्यावर कधीही साडेसाती येणार नाही, असे तिथले वृद्ध लाेक सांगतात.