चपला पाहून अनेक जण आनंदित झाले हाेते, तर काहींनी त्याच्या भारतीय मूळाचा उल्लेख न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. काेल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्रातील काेल्हापूर शहरात बनणारी चामड्याची चप्पल आहे. कुशल कारागीर ती हाताने बनवतात. मागील 100 वर्षांहून अधिक काळापासून या चपला बनवल्या जात आहेत.काेल्हापुरी चपला त्यांच्या सपाट साेल, मजबूत बांधणी आणि पायाच्या बाेटाच्या लूपसह खास डिझाइनसाठी ओळखल्या जातात. फॅशन एक्सपर्ट्स आणि साेशल मीडियावरील अनेक युजर्सनी पुन्हा एकदा ‘प्राडा’कडून भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेल्या काेल्हापुरी चपलांपासून प्रेरणा घेऊनही त्याचं मूळ कुठलं आहे, हे सांगणं टाळल्याने राग व्यक्त केला जात आहे. दरम्यान यापूर्वीही अनेक भारतीय फॅशनवरून प्रेरणा घेऊनही त्यांनी त्याचा उल्लेख टाळणं आणि रिब्रॅन्डिंग करणं असा प्रकार केला आहे.
इंडियन फॅशन आता जागतिक स्तरावर माेठी झेप घेत आहे. नेहरू जॅकेटपासून ते पगड्यांपर्यंत, कंबरपट्ट्यापासून ते दुपट्टास्टाईल स्कार्फपर्यंत, पारंपरिक भारतीय शैली अनेकदा आंतरराष्ट्रीय फॅशन शाेमधील रॅम्प वाॅकवर दिसल्या आहेत. आता, आणखी एक वस्तू जागतिक फॅशनच्या मंचावर आली आहे.झीरवर च्या चशप डिीळपस र्डीााशी 2026 लेश्रश्रशलींळेप मध्ये रॅम्प वाॅकवर चक्क ‘काेल्हापुरी चप्पल’ स्टाईलवर आधारित चपला माॅडेल्सच्या पायात दिसल्या आहेत.लक्झरी फॅशन ब्रँडच्या कपड्यांमध्ये आणि अॅक्सेसरीजमध्ये एका गाेष्टीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये एक सपाट, तपकिरी रंगाचा लेदर सँडल ज्यामध्ये पायाच्या बाेटावर लूप हाेता आणि ताे भारताच्या प्रतिष्ठित काेल्हापुरी चप्पलसारखा दिसत हाेता. जागतिक व्यासपीठावर या