ओशाे - गीता-दर्शन

27 Jun 2025 23:18:44
 

Osho 
 
तीरासारखे जे संकल्प बाहेर पडलेत ते व्यर्थ करण्यासाठी, अनडन् करण्यासाठी जे करता येईल ते साधकाने केले पाहिजे.जे संकल्प अजून प्रत्यंचेवर चढताहेत त्याच्या प्रत्यंचा ढिल्या साेडून तीर परत भात्यात टाकले पाहिजेत. जे संकल्प इच्छेच्या रूपात राहतील त्या इच्छांचे द्वंद्व समजावून घेतले पाहिजे की ते निवडण्यातून निर्माण हाेताहेत. डाव्या-उजव्याच्या बराेबर मध्यभागी थांबले पाहिजे आणि म्हटले पाहिजे की, यापुढे निवड बंद. आता म्हणजे एकच निवड आणि ती म्हणजे, निवडरहिततेची. टु बी चाॅईसलेस इज द ओन्ली चाॅईस.आता मी काेणतीच निवड करणार नाही, हीच माझी निवड! मग इच्छांचे मेघ लवकरच निघून जातील. नाहीसे हाेतील आणि जर आपण डाव्या-उजव्याच्या बराेबर मध्यात उभे रहाल तर, समत्व अनुभवाल. हा समत्वाचा अनुभव याेगारुढ हाेण्याचा दरवाजा उघडील. मग तेथे काेणताही संकल्प नसताे. तेथे पूर्ण शून्यात परम साक्षात्कार असताे.
 
कृष्णाची सगळीच सूत्र परम साक्षात्काराच्या निरनिराळ्या दारांवर आघात करतात. ताे अर्जुनाला म्हणताे आहे की, ‘तू समत्वबुद्धीला प्राप्त हाेऊन जा, मग तू याेगारुढ हाेशील. तू याेगारुढ झालास की तुझे सारे संकल्प गळून पडतील, सारे विकल्प मावळतील, चित्ताच्या सगळ्या चिंता नाहीशा हाेतील-तू निश्चिंत हाेऊन जाशील. वस्तुस्थिती तर ही आहे की मग तुला चिंताच राहणार नाही. तू चिंतेच्या पलिकडे जाशील.तुझं मनच राहणार नाही. मग असं म्हणता येईल की, तू अर्जुन राहणार नाहीस. तू फक्त आत्माच हाेऊन राहशील.आणि जेव्हा काेणी केवळ आत्माच राहताे, तेव्हाच त्याला अस्तित्वाचा आनंद, अस्तित्वाची समाधी-ते जे मंगल आहे, साैंदर्य आहे, स्वत:मध्ये लपलेले गहन सत्य आहे-त्यांचा प्रत्यय येताे.
Powered By Sangraha 9.0