प्रत्येक जिल्ह्यात ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्र उभाराव

27 Jun 2025 17:06:41
 
 

CM 
राज्यातील युवकांना राेजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सेंटर फाॅर इन्व्हेंशन, इनाेव्हेशन, इक्युबेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंगफ अर्थात ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्र उभारण्यात यावे. या केंद्रासाठी ‘एमआयडीसी’ मार्फत आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच, यासाठी आवश्यक असणारा 15 टक्के निधी जिल्हा नियाेजन समितीमार्फत देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.राज्यात सध्या दहा केंद्रे मंजूर असून, उर्वरित 26 जिल्ह्यांतही याच धर्तीवर ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.मंत्रालयातील कक्षात राज्यात ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्र उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
 
यावेळी उद्याेगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, नियाेजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डाॅ. राजगाेपालदेवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, काैशल्य, राेजगार, उद्याेजकता व नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्याेग विभागाचे सचिव डाॅ. अनबलगन पी., महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, राज्य काैशल्य विकास साेसायटी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी आदी उपस्थित हाेते.राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षणमिळावे, त्यांच्यात काैशल्यवृद्धी हाेऊन ते राेजगारक्षम व्हावेत, यासाठी काेणतीही तडजाेड करू नये.
 
यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्र उभारण्यात यावे. राज्यात सध्या दहा ठिकाणी ‘सी ट्रिपल आयटी’ केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. राज्यातील उर्वरित 26 जिल्ह्यांत ही केंद्रे उभारण्यासाठी टाटा कंपनीशी आवश्यक ताे समन्वय साधून कार्यवाही तातडीने करावी.या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी हजाराे युवकांना ‘एआय’, ऑटाेमेशन, राेबाेटिक्स, मशीन लर्निंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.या प्रकल्पांमुळे राज्यात उद्याेगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध हाेणार असून, नवउद्याेजकांना प्राेत्साहन मिळणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात उद्याेगस्नेही वातावरणाची पायाभरणी हाेणार आहे. युवकांचे काैशल्यवर्धन, राेजगार व स्वयंराेजगारासाठी यामुळे माेठी चालना मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0