मुंबई स्थित स्नेह आशा फाउंडेशनतर्फे डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत बृहन्मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये 10 अद्ययावत संगणक प्रयाेगशाळांचे उद्घाटन करण्यात आले; तसेच या प्रसंगी संस्थेतर्फे शिष्यवृत्ती याेजनेच्या तिसऱ्या बॅचमध्ये निवड झालेल्या 12 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आयाेजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, उद्याेजक निरंजन हिरानंदानी, अतिर्नित आयु्नत (पूर्व उपनगर) डाॅ. अमित सैनी व बांधकाम व्यावसायिक बाेमन इराणी आदी उपस्थित हाेते.
स्नेह आशा संस्थेच्या डिजिटल साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या संगणक प्रयाेगशाळांमध्ये एकूण 600 हून अधिक उच्च-क्षमता संगणक बसवण्यात आले असून, या उपक्रमाचा 6 वी ते 10 वी इयत्तांमधील 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ हाेणार आहे. संगणक साक्षरता, काेडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण यासारख्याआधुनिक काैशल्यांचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाईल. या कार्यक्रमात शिष्यवृत्ती याेजनेच्या तिसऱ्या बॅचअंतर्गत निवड झालेल्या 12 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी स्नेह आशा फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा सिद्धी जयस्वाल म्हणाल्या, ‘समाजातील शेवटच्या घटकापर्यंत डिजिटल ज्ञान पाेहाेचवण्यासाठी स्थापन केलेली संस्था ही केवळ करिअरची संधी नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मभान जागवणारे माध्यम ठरणार आहे.
मुंबई आणि ठाणे यामध्ये स्नेह आशा संस्थेने आज जे याेगदान दिले आहे आणि लवकरच आम्ही राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पाेहाेचण्याचा प्रयत्न करणार आहाेत.’ यावेळी अभिनेता सलमान खान यांनी स्नेह आशाचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पुढे नेण्याकरिता हातभार लावावा, या उद्देशाने संस्थेला 30 संगणक संच पुरवण्याचे आश्वासन दिले; तसेच संस्थेच्या सहसंस्थापक व ट्रस्टी स्नेहा जयस्वाल आपल्या मनाेगतात म्हणाल्या, ‘शिक्षणाची केवळ उपलब्धता पुरेशी नाही; खरे परिवर्तन तेव्हा घडते जेव्हासंधीसमवेत सश्नतीकरण देखील दिले जाते. आमच्या प्रयाेगशाळा म्हणजे केवळ संगणक असलेल्या खाेल्याच नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निर्माण केलेले प्लॅटफाॅर्म आहेत.’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, तंत्रज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन व सामूहिक शपथविधी यांमुळे डिजिटल समावेशनासाठीचा सर्वांचा दृढ संकल्प अधाेरेखित झाला. आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपासून राज्यस्तरीय खेळाडूंपर्यंत अनेक प्रेरणादायी कहाण्यांचा देखील गाैरव करण्यात आला.