प्रियजनांच्या सहवासात राहिल्याने दीर्घायुष्य मिळते

    02-Jun-2025
Total Views |
 
 


thoughts
 
 
दीर्घायुषी हाेण्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न मानव अनेक वर्षे करत आहे. पण, नुकत्याच झालेल्या संशाेधात दिसून आले आहे, की दीर्घायुषी हाेण्याचे रहस्य ना काेणत्या औषधात आहे, ना हायटेकमध्ये. पण, मानव प्रियजनांबराेबर राहिला तर दीर्घायुषी हाेताे, असे दिसून आले.जेनेट्निसची भूमिका मर्यादित दीर्घायुषी असण्यात जेनेट्निसचा महत्त्वाचा राेल असेल, असे आत्तापर्यंत मानण्यात येत हाेते.कारण एकाच कुटुंबातील अनेक लाेकांना दीर्घायुष्य मिळण्याच्या अनेक घटना समाेर असतात. पण, जेनेट्निसची भूमिका अत्यंत मर्यादित आहे, असे या संशाेधनात स्पष्ट झाले. नेचर मेडिसिन जर्नलमध्ये हे संशाेधन प्रकाशित झाले. यात नमूद केले आहे, की व्यक्तीच्या दीर्घायुषी असण्यात जेनेट्निसची भूमिका केवळ 3 टक्के आहे.
 
पर्यावरण आणि जीवनशैली महत्त्वाची दीर्घायुषी हाेण्यात आजुबाजूच्या पर्यावरणाचा आणि जीवनशैलीचा माेठा प्रभाव दिसून आला.दीर्घायुषी हाेण्यात पर्यावरण, जीवनशैली सुमारे 17 टक्के प्रभाव टाकतात, असे यात नमूद केले आहे.सामाजिक संबंध अत्यंत महत्त्वाचे या संशाेधनात एक महत्त्वाची बाब पुढे आली, ती म्हणजे ज्या व्यक्तीचे नातेवाईक, मित्रपरिवार व समाजातील इतरांशी चांगले संबंध असतात, ते अधिक काळ जगतात.अभ्यासात दिसून आले, की दीर्घायुषी हाेण्यासाठी व्यायामाइतकचे साेशल कने्नशनही महत्त्वाचे आहेत. व्यक्ती जीवनसाथीबराेबर राहत असेल तर आयुष्य वाढते. नियमित व्यायाम करणाऱ्या माणसाइतकेच त्याचे आयुष्य माेठे असू शकते.
 
जवळच्या व्यक्तींशी बाेलल्याने आयुष्य वाढते त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींना भेटत राहणे, विश्वासहार्य व्यक्तीशी बाेलत राहणे, यामुळेही मृत्युदर कमी हाेऊ शकताे, असेही यात दिसून आले.जर तुम्हाला चांगले आणि दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर केवळ व्यायाम आणि चांगला आहारच नाही, तर आपल्या जवळच्या लाेकांशी जाेडले जाणे गरजेचे आहे. आनंदी सामाजिक जीवन व्यतीत करणेही गरजेचे आहे.एकटे राहणाऱ्यांची इम्यून सिस्टीम कमकुवत जे लाेक सामाजिक स्तरावर एकटे असतात, इतरांपासून दूर, वेगळे असतात, त्यांची इम्यून सिस्टीम अपेक्षेपेक्षा कमकुवत असते. पण, याचे थेट कारण एकटेपणा आहे की एकटेपणामुळे लाेक कमी सक्रिय हाेतात, त्यांचे खाण्यावरचे लक्षही कमी हाेते, हे आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.
 
मानसिक स्वास्थ्य एकटेपणा बिघडवताे एकटेपणा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करताे. एकटेपणामुळे ज्यांना नेहमी उदास किंवा उत्साहहीन वाटते, त्यांना वेळेआधी मृत्यू येण्याचा धाेकाही वाढताे.त्याचप्रमाणे सातत्याने थकल्यासारखे वाटणे हाही माेठा संकेत असू शकताे. ज्यांना नेहमी दमल्यासारखे वाटते, त्यांच्यात अन्य लाेकांपेक्षा मृत्यूचा धाेका 45 टक्के अधिक दिसून आला.लहानपणीच्या अनुभवांचाही प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात, सबंध जीवनात लहानपणीच्या अनुभवांचीही महत्त्वाची भूमिका असते. तशीच ती मृत्यूतही असते, असे दिसून आले. या पाहणीत असे स्पष्ट झाले, की जे ब्रिटिश नागरिक लहानपणी अतिजाड हाेते, त्यांच्यात मृत्यूचा धाेका 16 टक्के अधिक दिसून आला.