मुलांना चष्मा हा त्यांच्या पालकांकडून अनुवंशिकतेमुळे लागू शकताे. जर एका पालकाला चष्म्याचा नंबर असेल तर त्यांच्या काही मुलांना चष्म्यांचा नंबर असू शकताे. जर दाेन्ही पालकांना चष्म्याचा नंबर असेल तर त्यांच्या सर्वच मुलांना चष्म्याचा नंबर असू शकताे. पालकांना किंवा घरात काेणालाही चष्मा नसला तरीही कधी-कधी मुलांना चष्म्याचा नंबर लागताे. अनुवंशिकता हे एकच कारण नसल्यानं हे असं हाेतं.निराेगी डाेळ्यांत येणारे प्रकाश किरण हे डाेळ्याच्या मागे असणाऱ्या पडद्यावर एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित येतात. त्यामुळे वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसतात.
ऱ्हस्व दृष्टीच्या (मायनस नंबर) डाेळ्यात डाेळ्यांची लांबी ही जास्त असल्यामुळे प्रकाशकिरण डाेळ्याच्या मागील पडद्यावर एकत्र येत नाहीत आणि वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत.जेव्हा आपण आंतर्वक्र भिंग (मायनस नंबरचं भिंग) डाेळ्याच्यापुढे ठेवताे तेव्हा प्रकाशकिरण डाेळ्याच्या मागील पडद्यावर एकत्रित येतात आणि आपल्याला प्रतिमा स्पष्ट दिसते. दीर्घ दृष्टीच्या डाेळ्यात डाेळ्याची लांबी कमी असते. त्यामुळे प्रकाश किरण डाेळ्यांच्या मागील पडद्यावर एकत्रित हाेत नाहीत आणि वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. जेव्हा आपण बहिर्वक्र भिंग (प्लस नंबरचं भिंग) डाेळ्यासमाेर ठेवताे तेव्हा वस्तू आपल्याला स्पष्ट दिसते.
अॅस्टीगमॅटिझम म्हणजे काय? आपल्या डाेळ्यांत असणाऱ्या बुबुळाला दाेन वक्रता असतात.आडवी आणि उभी अशा या दाेन वक्रता आहेत. या दाेन वक्रता जर समताेल नसतील म्हणजे एक फार वक्र असेल तर त्याला ङ्गअॅस्टीगमॅटिझमम असं म्हणतात.त्या व्यक्तीला वस्तूभाेवती सावलीसारखं दिसतं किंवा सरळ रेषा तिरक्या दिसतात. हा दाेष ङ्गसिलिंड्रीकलफ भिंग देऊन दूर करता येताे. या भिंगात फक्त एका विशिष्ट दिशेत नंबर असताे.चष्मा सतत वापरल्यावर नंबर कमी हाेताे? चष्मा सतत वापरल्यानंतरही चष्म्याचा नंबर कमी हाेत नाही. जसं पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे ते डाेळ्यांच्या लांबीवर अवलंबून असतं.त्यामुळे जशी मुलांची वाढ हाेते. तशी डाेळ्यांची लांबी वाढते.म्हणून लहान मुलांचा नंबर वयाच्या 18 वर्षांपर्यंत (कधी-कधी 21 वर्षांपर्यंत) स्थिर हाेत नाही.
टीव्ही पाहिल्यानं नंबर लागताे? लहान वयात मुलांना टीव्ही पाहण्याची सवय असते. टीव्ही पाहताना ते जवळ बसून पाहतात. त्यामुळे त्यांना टीव्ही पाहिल्यानेच चष्मा लागला, असं म्हटलं जातं. अशा स्वरूपाची तक्रार पालकही करत असतात. पण टीव्ही पाहिल्यानं चष्मा लागताेच असं नाही.फक्त टीव्ही बघितल्याने चष्म्याचा नंबर लागत नाही. तसंच गाजर, पालेभाज्या, काही व्हिटॅमिन न खाल्ल्यामुळे देखील चष्म्याचा नंबर लागत नाही. त्याचप्रमाणे ज्या मुलाला चष्म्याचा नंबर आहे त्याने नियमित गाजर, पालेभाज्या खाल्ल्यास त्याचा नंबर कमी हाेत नाही.लहान मुलांचं डाेकं आणि डाेळेही अनेकदा दुखतात. तरीही लहान मुलांना चष्म्याचा नंबरप्रमाणे डाॅक्टर चष्मा कसा वापरायचा, हे सांगतात. फक्त चष्मा वापरल्यामुळे देखील कधी-कधी दृष्टीत आणखी सुधारणा हाेते. जेव्हा वय वर्षं 8 ते 21 वर्षापर्यंत नंबर स्थिर हाेताे.तेव्हा लेझरच्या सहाय्यानं चष्म्याचा नंबर घालवता येताे. लेझर ही फारतर सुरक्षित आणि परिणामकारक उपचार पद्धती आहे. लेझरनं चष्मा कायमचा जाताे.