सद्गुरू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

    18-Jun-2025
Total Views |
 
 sa
 
सद्गुरू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (लिपाणे वस्ती, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी रोड, पुणे) हॉस्पिटलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 12 जून 2025 रोजी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. विरेंद्र बाबूराव पवार सर व डॉ. अंकिता विरेंद्र पवार यांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. 300 ते 350 गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, बीपी, नेत्रतपासणी, त्वचारोग तपासणी, शुगर, हाडांची घनता तपासणी, मूळव्याध व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या. उपप्राचार्य डॉ. राहुल कदम (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद पुणे), पीडीएचे सेक्रेटरी डॉ. महेश शिंदे, डॉ. अमित पालिवाल, डॉ. संतोष मुळीक, डॉ. डी. एल. शिंदे, डॉ. धनंजय पाटील अशा तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली.