डॉ. मोहितकर यांची ‌‘जय महाराष्ट्र‌’मध्ये मुलाखत

    17-Jun-2025
Total Views |
 
 jay
मुंबई, 16 जून (आ.प्र.) :
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‌‘जय महाराष्ट्र‌’ कार्यक्रमात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप व प्रवेश प्रक्रिया या विषयासंदर्भात राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील तरुणांना व्यावसायिक आणि करिअर उभारणाऱ्या गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
 
या वर्षी प्रवेशप्रक्रियेत ई-कौन्सिलिंगची संकल्पना प्रथमच राबवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशा पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रवेशाची संधी मिळणार आहे. संचालनालयामार्फत या वर्षी सेंटर ऑफ एक्सलन्स ही संकल्पनाही प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योगानुसार सुसंगत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता, अभ्यासक्रमाचे स्वरूप, रोजगाराच्या संधी ही सर्व माहिती डॉ. मोहितकर यांनी या दिली आहे. ही मुलाखत मंगळवारी (17 जून) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8 वाजता प्रसारित होईल. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.