पत्रकार संघाच्या ‌‘वृत्तभाषा‌’ स्मरणिकेचे प्रकाशन

    16-Jun-2025
Total Views |
 
 fd
पुणे, 15 जून (आ.प्र.) :
 
अभिजात मराठी भाषेच्या प्रवासात माध्यमांचे योगदान अधोरेखित करणाऱ्या ‌‘वृत्तभाषा‌’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जामध्ये माध्यमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या दृष्टीनेच पुणे श्रमिक पत्रकार संघाने ही विशेष स्मरणिका काढली आहे. माध्यमांमधील मराठीसाठी पत्रकार संघाच्या या उपक्रमाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशंसा केली.
 
फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या प्रकाशन समारंभासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, श्रीकृष्ण कोल्हे व श्रीकृष्ण पादीर उपस्थित होते. मराठी भाषा समृद्ध होताना, पत्रकारितेतून उलगडलेली मराठी, नव्या युगातील वृत्तलेखणी, पत्रकारितेचे नवे वळण आणि सीमोल्लंघन करणारी मराठी अशा पाच विभागांमध्ये माध्यमांतील अनेक वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी यात पत्रकारितेबद्दलचे विचार मांडले आहेत.