बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन

    12-Jun-2025
Total Views |
 
 

Police 
कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. या वेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर उपस्थित हाेते. या प्रदर्शनाचे आयाेजन त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. येरवडा, कळंबा, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ठाणे व नाशिक राेड या कारागृहांतील बंदीजनांनी बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे. माफक दरात उच्च दर्जाच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन वस्तूंची खरेदी केली.