‌‘दिलखुलास‌’मध्ये डॉ. विनोद मोहितकर यांची मुलाखत

    12-Jun-2025
Total Views |
 
dil
 
मुंबई, 11 जून (आ.प्र.) :
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप व प्रवेशप्रक्रिया या विषयासंदर्भात राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुवारी (12), शुक्रवारी (13) आणि शनिवारी (14 जून) आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका डॉ. मृण्मयी भाजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यात दहावी-बारावीचे निकाल लागले असून, शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
 
यामुळे राज्यातील युवकांना चांगले करिअर आणि व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या वर्षी संचालनालयामार्फत ई- कौन्सिलिंगची संकल्पना राबवण्यात येत असून, नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी कुठे व कसा अर्ज सादर करावा, अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध होणार आहेत, या विषयांवर डॉ. मोहितकर यांनी दिलखुलासमधून सविस्तर माहिती दिली आहे.