नियमित पाेट स्वच्छ न हाेणे यासाठी आहेत काही घरगुती उपाय

    12-Jun-2025
Total Views |
 

Health 
नियमित पाेट स्वच्छ हाेणे हे निराेगी आराेग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयाेग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकाेष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.नियमित पाेट स्वच्छ हाेणे हे निराेगी आराेग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयाेग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकाेष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
याेग्य वेळी बद्धकाेष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून 80 प्रकारचे वेगवेगळे आजार संभवू शकतात.मग कराच बद्धकाेष्ठतेवर काही घरगुती उपाय.
 
तूप : तुप हा फार जुन्या बद्धकाेष्टतेवर रामबाण उपचार आहे.तुपा मुळे आतड्यातील कार्य शक्ती वाढून पाेटाच्या अनेक समस्या दुर हाेण्यास मदत हाेते. जेवणाच्या वेळी एक चमचा तुप हे उत्तम आराेग्य ठेवून आजार दूर हाेतात दरराेज ग्लासभर दुधात दाेन चमचे तुप एकत्र करून रात्री प्यावे. बद्धकाेष्ठतेचा त्रास दूर हाेईल.
 
एरंडेल तेल : एरंडेल तेल हा बद्धकाेष्ठतेवरील फार जुना उपचार आहे.या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात.जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकाेष्ठतेचा त्रास संभवताे ताे दूर हाेईल.
 
अंजीर : सुके वा ओले अंजीर दाेन्ही नैसर्गिकरीत्या रेचक असल्यानेबद्धकाेष्ठतेवर फारच गुणकारी आहेत.त्यातून शरीराला पुरेसे फायबर मिळतात. बद्धकाेष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही अंजीर दुधात उकळा हे मिश्रण रात्री प्यावे. बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा अख्खे अंजीर खाणे अधिक फलदायी ठरेल.
 
जवस (अळशी) : अळशी तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकाेष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. दरराेज एक चमचा अळशी तुम्ही अन्य अन्नधान्या साेबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा पावडर करून गरम पाण्यासाेबत घेऊ शकता. भाजून मीठ लावून बडीसाेप प्रमाणे खाऊ शकता.
 
लिंबू : आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी अनशन पाेटी घेतलेले लिंबुपाणी पाेट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शाैचास सुलभ हाेण्यास मदत हाेते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ हाेते.