पावसाळा हा आनंददायक ऋतू असला, तरी त्यासाेबत अनेक अडचणीही घेऊन येताे, जसे की ओलसरपणा, बुरशी, डास, चिखल, आणि घरात घाण साचण्याची शक्यता. त्यामुळे पावसाळ्याच्या आगमनापूर्वीच घराची याेग्य तयारी आणि स्वच्छता करून ठेवणे आवश्यक असते. ही स्वच्छता फक्त साैंदर्यासाठीच नव्हे, तर आराेग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. सर्वप्रथम छत आणि गटारांची म्हणजेच ड्रेनेजची तपासणी गरजेची असते.छतावर गळती आहे का, हे तपासा. लहानसहान भेगा किंवा क्रॅक्स दिसल्यास त्यावर वाॅटरप्रूफ काेटिंग लावा. घरातील ड्रेनेजमध्ये कचरा, पाने, प्लास्टिक जमा झालं नसेल ना हे पाहा आणि ते स्वच्छ करा. पाणी साचल्यास ते गळतीचे कारण ठरू शकते.
खिडक्या व दरवाजांचे फाटलेले गादीचे भाग, रबरी पट्ट्या बदला, जेणेकरून पावसाचे पाणी आत येणार नाही. खिडक्यांवर जाळ्याबसवा, यामुळे डास आणि कीटक आत येणार नाहीत.जाळ्या तुटल्या असतील तर त्या बदलून घ्या. घरातील फरशी आणि भिंतींची स्वच्छता करून घ्या. घराच्या भिंती व फरशी स्वच्छ करून त्यावर अँटी-फंगल वाॅश लावा, विशेषतः बाथरूम, स्वयंपाकघर व काेपऱ्यांमध्ये त्याची अधिक गरज भासते. फरशीवरील ग्रीस, धूळ काढून टाका, जेणेकरून ओलसरपणामुळे घसरायचे धाेका कमी हाेईल. गरज नसलेले उबदार कपडे, पांघरुणे, गाद्या हवेशीर ठिकाणी ठेवा.
कपाटांत कॅम्पर, सिलिका जेल किंवा लवंग ठेवल्यास ओलसरपणा आणि वास दूर राहताे. स्वयंपाकघरासाठीही वेगळी तयारी करा. बसवा, यामुळे डास आणि कीटक आत येणार नाहीत.जाळ्या तुटल्या असतील तर त्या बदलून घ्या. घरातील फरशी आणि भिंतींची स्वच्छता करून घ्या. घराच्या भिंती व फरशी स्वच्छ करून त्यावर अँटी-फंगल वाॅश लावा, विशेषतः बाथरूम, स्वयंपाकघर व काेपऱ्यांमध्ये त्याची अधिक गरज भासते. फरशीवरील ग्रीस, धूळ काढून टाका, जेणेकरून ओलसरपणामुळे घसरायचे धाेका कमी हाेईल. गरज नसलेले उबदार कपडे, पांघरुणे, गाद्या हवेशीर ठिकाणी ठेवा.कपाटांत कॅम्पर, सिलिका जेल किंवा लवंग ठेवल्यास ओलसरपणा आणि वास दूर राहताे. स्वयंपाकघरासाठीही वेगळी तयारी करा.