सनी निम्हण आयोजित रक्तदान शिबिरातून मानवतेला वंदन

    10-Jun-2025
Total Views |
 
cg
 
सोमेश्वरवाडी, 9 जून (आ.प्र.) :
 
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने सोमेश्वर मंदिर प्रांगण, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने तरुण मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, मानवतेला मानवंदना म्हणून तब्बल 1104 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. सनी निम्हण गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. रक्तदानासारखं पुण्याचं कार्य दुसरं काही नाही. रक्त हे तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान हाच रक्ताचा एकमेव स्रोत आहे. म्हणूनच हे फार मोठं आणि पवित्र कार्य आहे. सनी विनायक निम्हण यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात एक चांगला संदेश गेला असून, रक्तदानासारख्या पवित्र कार्यासाठी नागरिकांना प्रेरणा मिळाली आहे. असे म्हणत त्यांनी सनी निम्हण यांच्या मौल्यवान योगदानाचे मनापासून कौतुक केले.
 
याप्रसंगी दत्तात्रय गायकवाड (माजी महापौर), माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, वसंतराव जुनवणे, शहाजी रानवडे, सुहास निम्हण, सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, खंडूशेठ आरगडे, ज्ञानेश्वर पारखे, मनोहर आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.