तळजाई टेकडीवर उत्साहात वृक्षारोपण;लोकसहभागातून 70 झाडांची लागवड

10 Jun 2025 14:08:23
 tal 
 
 पुणे, 9 जून (आ.प्र.) :
 
तळजाई टेकडीवर अभिषेक मुळे यांच्या पुढाकाराने 70 देशी झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली. या उपक्रमात स्वर्णाक्ष ढोलताशा पथकाच्या तालांमुळे उत्साही वातावरण निर्माण झाले, तर शंकर महाराज मठाच्या सदस्यांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवला. लहान मुलांचाही सहभाग लक्षणीय ठरला. अंशुल, अद्वय, अस्मि आणि कशिष यांनी स्वतः झाडं लावली. हरपले मॅडम, शिंदे सर, कोळपे अप्पा यांचे सहकार्य लाभले. झाडं लावणं ही एक जबाबदारी आहे आणि ती आपण यशस्वी पार पाडत आहोत, असे अभिषेक मुळे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0