सुधागड निवासी महिला मंडळ, चिंचवडचा तिसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा

09 May 2025 13:28:57
 
sa
 
चिंचवड, 8 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील कुटुंबांच्या सुधागड निवासी महिला मंडळाचा तिसरा वर्धापन दिन 1 मे रोजी साजरा झाला. या मंडळाचे सध्या 50 सदस्य आहेत. या मंडळातर्फे वर्षभर निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. केजी ते पीजीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, विद्यार्थी व महिलांना करिअर व व्यवसाय मार्गदर्शन, तसेच स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन असे कार्यक्रम साजरे केले जातात. 2022 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाच्या प्रथम कार्यकारिणी अध्यक्ष स्वाती म्हस्के, तसेच रक्षा कडू, ज्योत्स्ना शिर्के, अंकिता चव्हाण या मुख्य कार्यकारिणी पदावर आहेत. त्यांना मीनाक्षी चव्हाण व रेखा पोरे या अनुभवी महिलांचे नेहमीच मार्गदर्शन होत असते. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सुधागड तालुका मराठा समाजचे (पाली सुधागड) अध्यक्ष धनंजय साजेकर आशीर्वाद व मार्गदर्शन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी समाजातील विद्यार्थ्यांना मंडळाने स्पर्धा परीक्षेसाठी आयोजित कमी खर्चातील मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
Powered By Sangraha 9.0