भारतातली सर्फिंगची राजधानी

    02-May-2025
Total Views |
 
 

surfing 
समुद्रकिनारे, मासे, निवांतपणा असा विषय आला की भारतात बहुतेकांना गाेवा आठवताे. गाेव्यावरचा पाेर्तुगीज प्रभाव इतका प्रबळ आहे की, अनेकांना अनेक भागांमध्ये फिरताना आपण युराेपातच आहाेत का, असं वाटतं. गाेव्यात लाेकांना खेचून आणणारं आणखी एक आकर्षण म्हणजे मुक्त आणि स्वस्त मद्यसंस्कृती. त्यामुळे बीचवर गाेऱ्या ललना बुभुक्षितपणे पाहणे, सकाळपासून रात्रीपर्यंत दारू ढाेसणे, क्लबमध्ये जाऊन नाचणे, अशा सुट्टीच्या कल्पना असलेल्या पर्यटकांनी गाेवा बुजबुजलेला असताे. समुद्रकिनाऱ्यावरची शांतता, निवांतपणा सीझनमध्ये तरी गाेव्यात दिसत नाही. तिथून जवळच असलेला कर्नाटकातला मुल्कीचा किनारा मात्र सर्वस्वी वेगळा आहे.
 
ही सर्फिंग आणि कयाकिंग या लाटांवर स्वार हाेण्याच्या खेळाची भारतातली राजधानी बनलेली आहे. प्लॅस्टिकचे बाेर्ड घेऊन लाटांवर स्वार हाेण्याचा प्रकार भारतीयांनी खूप काळ सिनेमांमध्येच पाहिला. ताेही नायक-नायिका परदेशांत गेल्यानंतर. अलीकडे अनेक समुद्रकिनाऱ्यांवर सागरी खेळांच्या साेयीसुविधा असतात.मुल्कीने त्यात आघाडी घेऊन सर्फिंग आणि कयाकिंगच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इथे दारूबाज पर्यटकांचा बुजबुजाट नाही. नीर डाेसा, चटण्या, स्थानिक मासे, असं ताजं अन्न मिळतं. त्याच्यासाेबत अगदी ताजी ताडी असते. सर्फिंग आणि कयाकिंगमध्ये फारसा रस नसलेल्या, निव्वळ किनाऱ्यांवर शांतपणे पहुडण्याची इच्छा असलेल्या शांतताप्रेमी पर्यटकांसाठीही मुल्की हा स्वर्गच आहे.