अनेकदा आपल्या साेबत काही अशा व्यक्ती असतात, ज्या मनातून काही गाेष्टिमुळे किंवा प्रसंगामुळे अडचणीत सापडलेल्या असतात. एखादी गाेष्ट मनात ठेवून ते त्या गाेष्टीचा फार विचार करतात.परिणामी अनेकदा अशा व्यक्ती डिप्रेशनला बळी पडतात. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागताे. अनेकदा डिप्रेशनच्या भाेवऱ्यात अडकलेल्या व्यक्ती टाेकाचं पाऊलही उचलतात. याआधीही डिप्रेशन किंवा मानसिक आजारांना बळी पडून आत्महत्ये सारखं टाेकाचं पाऊल उचललेल्याचं समाेर आलं आहे. त्यामुळे आपल्या सहवासातील अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्याशी बाेलावं. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ताेडगा काढण्यासाठत्यांना मदत करावी. अशातच आता प्रश्न पडला असेल की, एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे की नाही, हे कसं ओळखावं? या प्रश्नाचं उत्तर म्हणून डिप्रेशनची काही लक्षणं जाणून घेऊयात.
1) सायकाॅलाॅजिकल लक्षणात व्यक्ती दुःखी आणि सगळ्यांपासून लांब आणि एकटी राहू लागते. याव्यतिरिक्त त्या प्रत्येक गाेष्टीत आपलीच चूक असल्याचं सांगू लागतात.
2) फिजिकली पाहायचं झालं तर, डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तींना रात्री शांत झाेप लागत नाही. त्यामुळे या व्यक्ती थकलेल्या दिसतात, तसेच त्यांचा आवाजही खालावताे.
3) डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेल्या व्यक्ती सामाजिक कार्यक्रमा मध्ये सहभागी हाेणं टाळतात. त्यांना कुठे जाणं, काेणाशी बाेलणं आवडत नाही. ते एकटं राहणं पसंत करतात.