जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या पाच वर्षांत एक काेटीवर

    02-May-2025
Total Views |
 
 

Tourism 
 
पुणे जिल्ह्यातील मुळशीत जागतिक पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयाेजन, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून जाणारी ग्रॅन्ड सायकलिंग चॅलेंज स्पर्धा, बारामती व इंदापूरला हाॅट एअरबलून फेस्टिव्हल, पवना धरण क्षेत्रात जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधा, ऐतिहासिक गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास, जिल्ह्यातील कलावंतांच्या सहभागातून गायन-वादन, नाटक, साहित्य, काव्य, कथावाचनासारख्या सांस्कृतिक महाेत्सवांचे आयाेजन, पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद देण्याबराेबरंच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या माेटरबाेटिंग, झिपलाइनसारख्या साहसी खेळ सुविधांची निर्मिती अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेल्या शाश्वत अशा पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीत करण्यात आले.
 
पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लाेककला,लाेकसंस्कृतीचा समृद्ध वारसा, पर्यटनवाढीच्या अमर्याद संधीचा उपयाेग करून जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार पवार यांनी केला असून, त्या अनुषंगाने जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत.त्यानुसार जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला असून, त्याचे सादरीकरण पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे सचिव डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डुडी आदींसह मंत्रालय आणि पुणे जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी 79 ट्नकेपर्यटक मुंबईला भेट देतात, तर अवघे 14 ट्नकेपर्यटक पुण्याला येतात. पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षांत जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या चाळीस लाखांवर, तर पुढील पाच वर्षांत एक काेटीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार काेटींची वाढ हाेईल. पन्नास हजार थेट राेजगार, तर पाच लाख अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेतील. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी हाती घेतलेले सर्व उपक्रम कायम सुरू राहतील. पॅराग्लायडिंग स्पर्धा, ग्रॅन्ड सायकलिंग चॅलेंज स्पर्धा, हाॅट एअरबलून फेस्टिव्हल, सांस्कृतिक महाेत्सवांचे आयाेजन दरवर्षी विशिष्ट कालावधीत केले जाईल.