परेशला एडिटर का बनायचं आहे?

19 May 2025 00:36:18
 
 

actoe 
सिनेमाच्या जगातला अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे संकलक.सिनेमा लेखकाच्या आणि एडिटरच्या टेबलावर तयार हाेताे. दिग्दर्शक त्याला हवं तेवढं शूटिंग करून ते संकलकापुढे आणताे आणि मग संकलक सिनेमाचा पाेत, विषय, मांडणी या सगळ्याचा विचार करून दृश्यांची लय ठरवताे. दिग्दर्शकाने ठरवलेला क्रम कधीकधी उलटा पालटाही हाेताे. हृषिकेश मुखर्जी हे फार कुशल संकलक हाेते. त्यामुळेच जनता हवालदार या सिनेमाचं जवळपास पाच सहा तासांचं चित्रिकरण झाल्यावर निर्माता हतबुद्ध झाला तेव्हा हृषिदांनी त्यातून अडीच तासांचा सिनेमा कापून दिला, अशी कथा सांगतात.
 
अभिनेता परेश रावलचा संकलनाशी तसा संबंध नाही. पण आता वय झाल्यावर शांतपणे काय काम करावं तर संकलन करावं, अशी इच्छा त्याने एका मुलाखतीत सांगितली. त्याचं एक कारण त्याने सांगितलं ते मार्मिक आहे. महागड्या फिल्मवर शूटिंग व्हायचं तेव्हा दिग्दर्शकांना बराेब्बर फ्रेम लावून नेमकेपणाने शूटिंग करण्याची सवय हाेती. अँगल, फ्लाे, मांडणी, सगळं डाेक्यात पक्कं असायचं. परेश म्हणताे, आता दिग्दर्शक डिजिटलवर साेय आहे म्हणून इकडून तिकडून सतरा कॅमेरे लावून, ड्राेन लावून सगळं काही शूट करून ठेवतात. त्यातून परफेक्ट सीन काढणारा माणूस संकलक आहे. तेच खरं क्रिएटिव्ह काम आहे ना!
Powered By Sangraha 9.0