ब्राह्मण महासंघाच्या दौंड तालुका शाखेचा शुभारंभ

13 May 2025 14:22:04
 
bra
 
दौंड, 12 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
रविवारी (11 मे) नरसिंह जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्यातील शाखा क्र. 21 चा शुभारंभ दौंड येथे झाला. पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाच्या कार्याची आणि दौंड शाखा स्थापन करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. या प्रसंगी दौंड शहरातील 600 ब्राह्मण कुटुंबांना शाखेशी जोडण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. अर्चना साने, दीपक गटणे, मंगेश वैद्य, बी. जी. नगरकर, योगेश खंगे गुरुजी, आनंद भालचंद्र नगरकर, श्रीमती खंगे वहिनी, प्रभाकर जोगळेकर या बैठकीस उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0