दिलखुलासमध्ये संजय सावकारे यांची मुलाखत

    12-May-2025
Total Views |
 
dil
 
मुंबई, 11 मे (आ.प्र.) :
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात वस्त्रोद्योग ‌‘विभागाच्या योजना, शंभर दिवसाच्या कामकाजाचा आराखडा व अंमलबजावणी' या विषयावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत सोमवारी (12), मंगळवारी (13) आणि बुधवारी (14 मे) रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाइल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तसेच, जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी (13 मे) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच, महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे.
 
निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यातील वस्त्रोद्योग उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्रांच्या मजबुतीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास करणे आणि या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कामकाजात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यांची अंमलबजावणी करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगानेच पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्रांच्या मजबुतीकरणासाठी व चालना देण्यासाठी विभागामार्फत घेण्यात आलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी याबाबत संजय सावकारे यांनी दिलखुलासफ आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून माहिती दिली आहे.