डीआरटी लोकअदालतीत 91 कोटींचे 180 खटले निकाली

    12-May-2025
Total Views |
 
 dm
पुणे, 11 मे (आ.प्र.) :
 
कर्ज वसुली न्यायाधिकरण अर्थात डीआरटी पुणे कार्यालयात 10 मे रोजी लोकअदालत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये ओए/ एसए/एम संबंधी 91 कोटी रुपयांच्या तडजोड रकमेसह 180 प्रकरणे निकाली काढण्यात आली, ज्यामध्ये वसुली कार्यवाहीच्या 7 प्रकरणांचा समावेश आहे. पुणे येथील डीआरटी येथे पीठासीन अधिकारी दिलीप जी. मुरूमकर यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत झाली, तर पॅनल क्रमांक एक म्हणून सदस्य ॲड. कुणाल कांबळे यांच्यासह न्यायाधीश करण चक्रनारायण, तर पॅनल क्रमांक दोनमध्ये ॲड. शीतल भुतडा आणि पॅनल तीनमध्ये सदस्य म्हणून ॲड. भक्ती रोकडे यांच्यासह वसुली अधिकारी रविकांत यादव सहभागी झाले होते.
 
लोकअदालतीचे नियोजन रजिस्ट्रार अजय कुमार साहू यांनी केले. सहाय्यक रजिस्ट्रार सूर्यकांत प्रकाश निकम, वसुली अधिकारी विनय सक्सेना, पीएस मनजीत कौर, विभाग अधिकारी सतीश पतमासे व डीआरटी पुणेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत 148 कोटी रुपयांचे एकूण 189 प्रकरणे सूचीबद्ध करण्यात आली होती, त्यापैकी 180 प्रकरणे ओए/एसए/एमए संदर्भात 91 कोटी रुपयांच्या तडजोडीने निकाली काढण्यात आली, ज्यात वसुलीच्या 7 प्रकरणांचा समावेश होता. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांनी पूर्ण सहकार्य केले. पुणे डीआरटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. ट्रंम्बके, उपाध्यक्ष ॲड. प्रदीप यादव, सचिव ॲड. प्रीती भट, नारायण खामकर आणि पुणे डीआरटी बार असोसिएशनच्या इतर सदस्यांनी लोकअदालतीत सहभाग घेतला.
 
आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांच्या अधिकाऱ्यांनी लोकअदालतीत सक्रिय सहभाग घेतला. पुण्यातील पहिली लोकअदालत 24 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. एकूण 10 लोकअदालती घेण्यात आल्या, ज्यामध्ये एकूण 2465 कोटी रुपयांची 1388 प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती डीआरटी पुणेचे रजिस्ट्रार अजय कुमार साहू यांनी दिली.