यशस्वितेच्या शिखरावर राहण्यासाठी ऊर्जावान राहा

    07-Apr-2025
Total Views |
 
 


thoughts
 
 
 
काेणत्याही क्षेत्रात दीर्घकाळ यशस्वी राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. जेवण, व्यायाम, सामाजिक उपक्रम या सगळ्या गाेष्टींचे नियाेजन करावे लागते. त्यातून ऊर्जा मिळते.स्वतःला सतत ऊर्जा मिळवणे हे वैकल्पिक नाही, तर नेहमी यशस्वी हाेण्यासाठी गरजेचे आहे, असे यशस्वी लाेक मानतात.सतत धावपळीपेक्षा ऊर्जा वाढविण्याला महत्त्व यशस्वी उद्याेजक ऊर्जा वाढविण्याला महत्त्व देतात. सतत धावपळ केल्यानेच चांगले निर्णय हाेतात, असे त्यांना वाटत नाही. त्या ऐवजी ते राेज प्रयत्न करून ऊर्जा मिळवतात.त्यामुळेच लक्ष्यावर मन केंद्रित करू शकतात. वेगवान निर्णय घेऊ शकतात. श्रेष्ठ राहू शकतात.आराम आणि रिचार्ज हे कायमस्वरूपी यशासाठी महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना प्राथमिकता देणे हा रणनीतीचा भाग आहे.त्यामुळे यशस्वी लाेकांच्या दीर्घकालीन यश प्राप्तीमध्ये ऊर्जा प्राप्तीच्या प्रयत्नांचे याेगदान असते. या पद्धती काेणत्या आणि त्यामुळे काय फायदा मिळताे हे पाहूयात.
 
शरीराला सक्रिय ठेवल्याने तणावापासून मु्नत काेच मार्शल गाेल्डस्मिथ यांनी सांगितले, की शरीराला सक्रिय ठेवल्याने राेजच्या तणावापासून मुक्त हाेण्यास मदत मिळते. नेता, माेठ्या कंपन्यांचे संचालक यांच्यासाठी सकाळी फिरणे आणि चालता चालता केलेल्या मीटिंग ही आता प्राथमिक गरज आहेत.स्क्रीनपासून दूर आणि निसर्गाच्या जवळ कामाच्या निमित्ताने यशस्वी लाेकांना सतत स्क्रीनजवळ राहावे लागते. पण, त्यांना श्नय असेल तेव्हा ते स्क्रीनपासून दूर जाऊन निसर्गाशी जाेडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मन प्रफुल्लित हाेऊन अधिक काम हाेते, असे त्यांचे मत आहे.कामाच्या तणावाचा स्फाेट हाेण्याची वाट पाहत नाहीत यशस्वी माणसे काम करताना कधी थांबले पाहिजे, हेही जाणतात. थांबण्यासाठी कामाच्या तणावाचा स्फाेट हाेण्याची वाट पाहत नाहीत. मार्गदर्शक कैराेलिन साेल्डाे यांनी सांगितले, की यशस्वी माणसे छाेटे-छाेटे ब्रेक घेतात. ते म्हणतात, की दहा दिवस सुट्टी घेण्यापेक्षा छाेटे छाेटे ब्रेक घेणे गरजेचे आहे.
 
त्यामुळे थकवा येण्याआधीच तिला थांबवले जाते. यशस्वी लाेक अशा ब्रेकचा वापर गेलेली ऊर्जा परत मिळविण्यासाठी करतात.ऊर्जा मिळण्यासाठी ब्रेक ब्रेक म्हणजे सुट्टी नव्हे, तर कामासाठी पुन्हा ऊर्जा मिळवणे.ही ऊर्जा परत मिळविण्यासाठी काही उपाय याेजले जातात.जसे, काही यशस्वी लाेक ब्रेकमध्ये थाेडे चालतात. काम वेळेत संपविण्याची घाई असेल तर चालता चालता महत्त्वाच्या मीटिंगही हाेतात. राेज 10 मिनीट चालणे गरजेचे आहे, असे अनेक यशस्वी लाेकांचे मत आहे. काही जण 5 मिनटांचे ध्यान करणे, स्ट्रेच करणे किंवा मीटिंगच्या वेळी काही क्षण शांत बसणे पसंत करतात.ऊर्जा स्तरावर लक्ष बिझनेस काेच ब्रायन ट्रेसी म्हणतात, की यशस्वी लाेक आराेग्याला महत्त्वपूर्ण मानतात. झाेप, व्यायाम, खाण्यासाठी वेळ काढतात. त्यासाठी ते दुसऱ्यावर काम साेपवतात. ऊर्जेनुसार काम करतात. ऊर्जा कमी असेल तर सामान्य काम करतात. इतर वेळी रचनात्मक काम करतात. दिवसाचे नियाेजन करताना ऊर्जे वर लक्ष ठेवातात. शरीर-मन थकले असले, तर नवीन काम हातात घेत नाहीत.
 
कसे करावे? आपणही आपल्या दिवसाचे नियाेजन कसे करावे हा प्रश्न असू शकताे. त्यासाठी पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या. तुम्हाला स्वतःला सर्वात जास्त ऊर्जावान कधी वाटते, याचा शाेध घ्या.त्यानुसार कामाचे, विश्रांतीचे नियाेजन करा, असे तज्ज्ञांनी सांगितले. दिवसभर काम करताना, मध्ये मध्ये थांबले पाहिजे, हे मनात पक्के करा. प्रत्येक तासात काही मिनिटे कामापासून दूर राहा.डाे्नयाला आराम द्या. रिसेट करा आणि पुन्हा कामाला लागा.तणाव घेऊ नका स्मार्ट बिझनेसमॅनला माहीत असते, की काेणते काम कधी कमी करायचे आहे. त्यांना माहीत असते, की प्रत्येक कामात व्यक्तिगत लक्ष देणे गरजेचे नाही. छाेट्या समस्या माेठ्या हाेऊ देत नाहीत. आव्हानात्मक परिस्थितीतही शांत राहतात.सकाळचे रुटीन व्यवस्थित असावे माेटिव्हेटर ब्रँडन ब्रुचार्ड यांनी सांगितले, की यशस्वी लीडरचे सकाळचे रुटीन खूप व्यवस्थित असते. दिवसभराचे काम सुरू हाेण्याआधी चालणे, ध्यान, वर्कआऊट यासाठी ते वेळ काढतात. राेज रिचार्ज हाेण्यासाठी हे गरजेचे आहे. राेज सकाळी उठल्या उठल्या ई मेल चेक करणे थांबवावे. त्याऐवजी स्वतःच्या शारीरिक, मानसिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत.