एकमेकांचे म्हणणे आधी नीट पूर्णपणे ऐकून घ्या. कारण अनेकदा बाेलायचे वेगळेच असते. मात्र त्याचा अर्थ वेगळाच घेतला जाताे.
त्यामुळे गैरसमज वाढतात आणि वादाला ताेंड ुटते. दुसऱ्याच्या जागी जाऊन एकमेकांचा विचार करा. त्यामुळे समाेरच्याची बाजू नीट समजेल. राग, चिडचिड कमी हाेईल.खूप जण नात्यात जाेडीदारावर बंधन ठेवत असतात. बंधनामुळेही कधी कधी नाते नकाेसे हाेऊ लागते. जर तुम्ही अशी बंधने घालत असाल, तर त्या बंधनातून मुक्त हाेण्याचा समाेरच्याचा मानस असताे. त्यामुळे अशी व्यक्ती जाेडीदाराच्या काेणत्याही गाेष्टीला कंटाळत असते.
जाेडीदाराला ही व्यक्ती आपल्या हाताखाली किंवा शब्दाबाहेर नाही असे वाटते; पण हा तुमचा गैरसमज आहे, असे काहीही नाही. ती व्यक्ती तुमच्या बंधनातून मुक्त हाेण्याचा मार्ग शाेधत असते. यात काहीही शंका नाही. बरेचदा समाेरच्याचा कंटाळा येणे यामध्ये आपलीही काहीतरी चूक नक्की असते. जर तुम्हाला असा कंटाळा तुमच्या जाेडीदाराचा येत असेल, तर ताे काेणत्या कारणामुळे येताे ते ओळखा. खूप जणांना आपल्या काेणत्याही चुका दाखवल्या की, समाेरची व्यक्ती नकाेशी हाेऊन जाते. पण, असे का हाेते ते ओळखण्यासाठी तुम्ही आधी आपण काय चुकलाे हेदेखील माहीत करून घ्या. त्यामुळे नात्यात काय करायला हवे हे समजणे साेपे जाते. त्यामुळे दुसरा काय चुकला यापेक्षा मी काय चुकताे याकडे लक्ष द्या.