साताऱ्यात उद्याेगवाढीसाठी सर्वताेपरी प्रयत्न करणार

    07-Apr-2025
Total Views |
 
 

Satara
उद्याेग मंत्री उदय सामंत यांची माहिती : एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाचे लाेकार्पणसातारा जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. येथे उद्याेग व औद्याेगिक वसाहतींच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. सातारला आयटी पार्क व्हावा, अशी अनेक वर्षाची मागणी असून, यासाठी सुचविण्यात आलेल्या जागा चांगल्या आहेत. सातारला निर्यातीची परंपरा माेठी असून, ती अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.निर्यात पारिताेषिक समारंभ येथे घेण्यात येईल यासाठी मासने समन्वयक म्हणून जबाबदारी घ्यावी. उद्याेजकांचे प्रश्न साेडवण्यासाठी विभागस्तरावर उद्याेग विभागाचा जनता दरबार घेण्यात येईल.उद्याेजकांची प्रलंबित कामे, मागण्या, समस्यांचा त्वरित निपटारा करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी केले.मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन ऑफ सातारा (मास) आणि महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विद्यमाने उद्याेजकांशी संवाद मेळाव्याचे मास भवन येथील सर धनाजीशा कूपर सभागृहात आयाेजन करण्यात आले हाेते.यावेळी सामंत यांनी उद्याेजकांशी संवाद साधला.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भाेसले, उद्याेजक फाराेखजी कूपर, एमआयडीसीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, मुख्य अभियंता नितीन वनखंडे, विभागीय अधिकारी डाॅ. अमितकुमार साेडगे, कार्यकारी अभियंता लिराप्पा नाईक, उप अभियंता लहु कसबे, जिल्हा उद्याेग केंद्राचे महाव्यवस्थाक उमेश दंडगव्हाळ, मासचे अध्यक्ष मानस माेहिते, धैर्यशील भाेसले, बाळासाहेब खरात यांच्यासह उद्याेजक उपस्थित हाेते.साताऱ्याला वीज, पाणी मुबलक आहे, उद्याेगाचे पाणी उपलब्ध आहे, उद्याेगवाढीसाठी पाेषक वातावरण आहे.देशाबाहेरील अनेक उद्याेजक महाराष्ट्रात येण्यासाठी सकारात्मक असतात.त्यामुळे उद्याेग वाढीत सातारा मागे राहू नये, अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली.शासनाच्या सकारात्मक धाेरणामुळे कूपर उद्याेग समूह माेठा झाला आहे. हा उद्याेग समूह उत्पादित केलेल्या मालाची माेठ्या प्रमाणात निर्यात करत असून, उद्याेग समूहात स्थानिकांनाच राेजगार दिला जात असल्याचे कूपर यांनी सांगितले.