सुंदर दिसण्यासाठी पुरुषांमध्येही जागरूकता वाढत आहे

    07-Apr-2025
Total Views |
 
 


Health
 
 
 
पुरुषाचा पराक्रम पाहावा रूप नाही, असे कितीही म्हटले गेले तरी, रुबाबदार, सुंदर पुरुषांचा प्रभाव लाेकांवर जास्त पडताे, हे सत्य आहे. विशेषतः काॅर्पाेरेट वर्ल्डमध्ये चांगले काम करण्याबराेबरच चांगले दिसणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आता पुरुषांमध्येही आपल्या लुकविषयी जागृती वाढताना दिसत आहे.चांगले दिसण्यासाठी केला जाताेय खर्च फायनान्स, बिजनेस, लाॅ, मॅनेजमेंट आदी क्षेत्रांमधील व्यावसायिक सर्जरीपासून नियमित सेल्फ केअर रुटीनपर्यंत चांगले दिसण्यासाठी भरपूर खर्च करतात. अमेरिकेतील अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील ट्रेडर जाॅन यांनी वयाच्या 25व्या वर्षी हेअर ट्रांसप्लाॅट केले. त्यांनी नुकतीच तुर्किए येथे हेअर ट्रीटमेंटसाठी सुमारे 19 लाख रुपये खर्च केले. दाेन कंपन्यांचे मालक असलेले डेरेल स्पेंसर त्वचा चांगली ठेवण्यासाठी तीन महिन्यांत सुमारे एक लाख रुपये खर्च करतात. 45 वर्षीय काॅर्पाेरेट लाॅयर डैन यांनी दाेनदा बाेटाॅ्नस प्रक्रिया केली आहे.
 
एका सेशनसाठी सुमारे 85 हजार रुपये खर्च केले आहेत.प्रभावी दिसण्यासाठी शस्त्रक्रिया अमेरिकन साेसायटी ऑफ प्लॅस्टिक सर्जन्सने केलेल्या पाहणीत हे लक्षात आले, की गेल्या वर्षभरात काॅस्मेटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांमध्ये 8 टक्के वाढ झाली आहे. बाेटाॅ्नस फिलर्स, केमिकल पील्स, लेजर हेअर रिमूवलसारख्या प्रक्रियांमध्ये 7 टक्के वाढ झाली.प्लॅस्टिक सर्जन डाॅ. डैनियल मैमन यांनी सांगितले, की माेठ्या पदांवर काम करणारे पुरुष आता या प्रक्रियांना हेअर कट सारख्या मूलभूत बाबींप्रमाणेच बघतात.बाेटाॅ्नस लाेकप्रिय प्लॅस्टिक सर्जन डाॅ. जाेसेफ हदीद यांनी सांगितले, की ज्यांना थकलेले किंवा उदास दिसण्याची भीती वाटते, त्या पुरुषांमध्ये बाेटाॅ्नस लाेकप्रिय आहे. माझे 15 टक्के ्नलायंट्स पुरुष आहेत. त्यात अर्ध्यापेक्षा अधिक काॅर्पाे रेट व्यावसायिक आहेत. त्यांना कामाच्या ठिकाणी प्रभावशाली दिसण्याची इच्छा असते.
 
चांगले दिसण्याचा व्यावसायिक फायदा प्लॅस्टिक सर्जन कॅथरीन चांगे यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही स्वतःची चांगली देखभाल करता, चांगले कपडे घालता, तेव्हा लाेक तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहतात. तुम्ही आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत आहात, असे त्यांना वाटते.त्यामुळे व्यावसायिक फायदा मिळताे. तुम्ही उत्साहवर्धक दिसत असाल तर मॅनेजर म्हणून लाेक तुम्हाला अधिक पसंत करतात.तुम्ही सांगितलेले ऐकतात. कॅथरीन म्हणतात, तुम्ही कितीही माेठ्या पदावर पाेहचलात तरी स्वतःला चांगले प्रेझेंट करणे पुरुषांसाठी गरजेचे आहे. विशेषतः सीईओसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना. ज्यांना चांगले काम करून दाखवायचे आहे आणि ते कंपनीचा चेहरा आहेत, अशा अधिकाऱ्यांनी स्वतः च्या दिसण्याची काळजी घेणे गरजेचे असते.