मनातील वैताग दूर करून माेकळेपणाने जगा

06 Apr 2025 22:41:08
 
 
 
 
happy
जीवनात बऱ्याचदा आपल्या आवडीचे काम नसेल व समाेरच्याला आपण काही सांगू शकत नसताे तेव्हा स्वत:ला चिडचिडे बनवून घेताे. रागाच्या भरात माणूस काहीही व्यक्त करताे, पण चिडचिडीत ताे राग स्वत:त नेऊन नवे रूप देताे आणि स्वत:लाच दुखावताे. यासाठी मनपसंत काम नसेल तर सर्वप्रथम चीड येणार नाही हे धैर्य बाळगावे. जेव्हा एखादा चिडचिडा हाेताे तेव्हा मूळ वस्तूंशी लढू लागताे. रागीट मानूस चैतन्याशी लढताे, पण चिडचिडा मुळाला भिडताे. काही लाेक अचानक पेन फेकून देतात वा काही गेट जाेरात बंद करतात.
 
काेणी कपडे फाडताे, तर काेणी भांडीच फेकताे. जेव्हा मनपसंत गाेष्ट वा काम नसेल तर आतून एक वैताग येताे. ताे वैताग उडवून टाका. जेव्हा पिंजरा उघडून आतील पक्ष्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास ताे घाबरताे व फडफड करू लागताे, पण जर आपण हाताने पकडून त्याला उडवले तर चटकन उडून जाताे.माणसाच्या मनातील वैतागही असाच असताे. जाेपर्यंत ताे बाहेर काढणार नाही, ताेपर्यंत ताे बाहेर न पडता फडफडत राहील, पण एकदा माेकळेपणाने ताे उडवला तर ताे वैताग उडून जाईल व चिडचिड हाेण्याची श्नयता नाहीशी हाेईल.तेव्हा आपण रागापासून दूर राहाल व आवडते काम नसूनही हे मानून घ्याल की जे हाेते ते चांगलेच हाेते.
Powered By Sangraha 9.0