‘आपला मुलगा आता काय करीत आहे?’ ‘स्वामीजी, काही वर्षांपूर्वी त्याने आत्महत्या केली.’ उत्तर देताना वडिलांचे डाेळे भरून आले.थाेडा वेळ ते गप्प बसले. मी चुकीचा प्रश्न विचारल्याचे मला जाणवले. नकळत विचारलेल्या या प्रश्नाने जी जखम मी ताजी केली हाेती त्यावर माझे डाेळे प्रेमस्वरुपी पट्टी बांधू इच्छित आहेत हे वडिलांनी जाणले.थाेडे स्थिर झाल्यानंतर ते कारण सांगत म्हणाले, ‘ स्वामीजी, ताे दहावीत हाेता. शाळेत मस्ती करताना एका शिक्षकाने पाहिले. शिक्षकाने ही गाेष्ट शाळेच्या प्राचार्यांना सांगितली. मुलाला शिस्तीचा धडा देण्यासाठी धमकी दिली गेली की, तुला बाेर्ड परीक्षेत सामील हाेण्याची रिसीट देणार नाही. त्याने खूप गयावया केली पण प्राचार्यांवर काही परिणाम झाला नाही. जर हे आम्हाला कळले तर काय हाेईल या विचाराने त्याचा थरकाप झाला. त्याने यापूर्वीच फाशी घेतली.’ ते निघून गेले.
पण माझे मन प्रश्नाचे मूळ शाेधत राहिले हाेते. आत्महत्येचे मूळ काय हाेते? भविष्याबाबत चिंताग्रस्त, अत्याधिक भावुक मन वा प्रतिमेविषयी जागरूक व्यक्तिमत्व? कदाचित हे सारे फॅ्नटर कमीजास्त एकत्रित असू शकतात. जीवनात जवळपास प्रत्येकाला अशा परिस्थितींमधून जावे लागते. पण यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग आहे का? भगवान स्वामीनारायण यांनी आपल्या वचनामृत ग्रंथात सुंदर गाेष्ट सांगितली आहे की, फक्त बुद्धिमान व्यक्तीच जीवनात खूश राहते.जीवनात अनिश्चितता नक्कीच आहेत. फक्त यामुळे की, आपण प्रामाणिकपणे पुरुषार्थ केला आहे.आपल्याकडून काेणतीही चूक, गुन्हा वा प्रयत्न झालेला नाही. याचा अर्थ हा नाही की जीवनात सारे पैलू आपल्या बाजुला आहेत. अशावेळी खूश राहण्याचा उपाय आहे समजुतदारपणा.
समजुतदारपणा काेणतीही भरीव गाेष्ट नाही की जी पैशाप्रमाणे माेजता वा ठेवता येऊ शकेल.पण यात असे दिव्यत्व आहे की जे काम कराेडाे देऊनही हाेऊ शकत नाही ते समजुतदारपणे करता येऊ शकते.संकटात स्वत:ला विचारावे की, ‘जास्तीत जास्त काय हाेईल?’ नक्कीच त्यावेळी एक गंभीर चित्र समाेर येईल, पण जर आपण ती श्नयता आपल्या मनाने स्वीकारण्याचे साहस केले तर वास्तविकता एवढी गंभीर नसेल.महंत स्वामी महाराजांच्या जीवनात एक काळ असाही आला हाेता की, जेव्हा क्राेध-द्वेषामुळे लाेकांनी त्यांचा खूप अपमान केला हाेता.
पण, ते शांत राहिले, स्थिर राहिले, काेणतीही प्रतिक्रिया नाही, काेणताही प्रतिकार नाही. त्या कठिण काळातही त्यांचा आंतरिक आनंद टिकून हाेता.एकदा त्यांनी सांगितले हाेते की, जर मी हेही ठरवून घेले की, संपूर्ण ब्रह्मांड माझा अपमान करीत आहे तरीही मला ईश्वराचा जाे आनंद मिळाला आहे ताे काेणीही हिरावू शकत नाही.त्या घटनेतही जर मुलाने असा विचार केला असता की, जास्तीत जास्त काय हाेईल, कदाचित माझे आई-वडील रागावतील आणि काही कठाेर बाेलतील. बस एवढेच. हेही जर मनाने स्वीकारले असते तर आज ताे हसरा मुलगा आपल्या आई- वडिलांसाेबत खेळत राहिला असता.