सर्वसाधारणपणे हाेणाऱ्या चुका: ‘कठीण निर्णय घेताना तुम्ही जास्त कशाला महत्व दिले पाहिजे - अंतःप्रेरणा (इनट्युशन्स) की भावना (इमाेशन्स)? मी कायमच अंतः प्रेरणेला प्राधान्य देताे. त्यातून येणाऱ्या संकेतांना मी मप्रॅक्टिकलफ पातळीवर पडताळून पाहताे, ज्याचा उपयाेग मला माझे निर्णय घेण्यामध्ये हाेताे. कधी - कधी आपण एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे इतके विश्लेषण करत बसताे, की निर्णय तर हाेत नाहीच, आपल्या निर्णय -क्षमतांवरचा आपलाच विश्वास उडताे,’ विवेक गुप्ता (रिस्क मॅनेजमेंट काॅन्सलटन्ट) सांगत हाेते. निर्णय प्रक्रिया घडत असताना, आपल्या भावनांना आवर घालायला लाेक विसरतात. अशा वेळेस गरज असते ती भावना आणि वास्तविक, या दाेन्हीचे संतुलन साधण्याची. निर्णय घेण्याअगाेदर आपला स्वाभाविक कल काेणत्या बाजूला आहे, हे स्पष्ट हाेणे गरजेचे असते.आपण याआधी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम काय झाले याचे विश्लेषण केल्यास, सध्याचे निर्णय चुकण्याची शक्यता कमी हाेते.
समस्येचे विश्लेषण: आपल्या समाेरील समस्या नेमकी काय आहे, हे ठरवण्यापासून सुरुवात हाेते. ती समस्या साेडवण्यासाठी नियाेजन (प्लॅन) तयार करून ठेवता येताे. निर्णयासंबंधी काही शंकेच्या जागा असतील, तर माहिती शाेधून त्या दूर करता येतात. या प्रक्रियेमुळे, निर्णय घेण्याच्या ‘डेडलाईन्स’ पाळतात येतात, चालढकल हाेत नाही. छाेटे निर्णय असतील तर ते अंतःप्रेरणेवर वतातडीने घेता येतात. माेठे निर्णय घ्यायचे असतील तर सूक्ष्म पद्धतीने विचचार करण्याची गरज असते.दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घ्यायचे असतील, तर प्रश्नाच्या किंवा त्या समस्येच्या मुळांपर्यंत पाेहाेचावे लागते. चुकीचे निर्णय हाेऊ नयेत यासाठी, त्या निर्णयाची ‘शाॅर्ट टर्म’ व ‘लाॅन्ग टर्म’ किती किंमत माेजावी लागेल व त्याचे फायदे किती मिळतील, याचा तपशीलाने विचार करून निर्णय घ्यावा.
सर्व पर्यायांचा विचार करा: ‘जागरूकतेने व तटस्थपणे निर्णय घ्यायचे असतील तर तुमच्याकडे असलेल्या पर्यायांपैकी निवडक पर्यायांचाच विचार करा. प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि मर्यादा याचे विश्लेषण करा. तसेच त्या पर्यायांचे धाेके आणि परिणाम, हे तपासूनच निर्णय निश्चित करा. माझ्या दृष्टीने महत्वाचे हे असायला हवे की, मी घेतलेल्या निर्णयाचा कितीही वाईट परिणाम झाला, तरी मी त्याबाबत संयमित (कम्फर्टेबल) असले पाहिजे. बहुतेक निर्णयांचा हेतू, हा सकारात्मक आणि सुधारणा हाेण्यासाठीच असताे. तरीही, जे निर्णय चुकतात, त्यांना तुम्ही सामाेरे जाऊन, त्या परिस्थितीत टिकून बाहेर पडू शकता का? जर हे करायला जमले, तर निर्णय घेणे आणि धाेके पत्करणे, हे पुढील आयुष्यात साेपे जाते,’ विवेक गुप्ता.
दुसऱ्यांशी चर्चा करा: प्रत्येक लाेकप्रिय निर्णय, याेग्य असताेच असे नाही. तुमच्या ’टीम’विषयी निर्णय घेताना कायमच सर्वांच्या समाधानाचा असलेला निर्णय घेऊ नका. त्यापेक्षा, सर्वांना खरा आनंद आणि फायदा मिळवून देणारा पर्याय निवडा.त्या परिस्थितीत, जे काेणी संबंधित असतील आणि ज्यांच्यावर तुमच्या निर्णयाने परिणाम हाेणार आहे, त्यांची मते व मार्गदर्शन घ्या. ज्यांचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, त्यांना त्याचे श्रेय (क्रेडिट) द्या. तुमच्या ग्रुपमध्ये सद्भावना तयार झाल्यास त्याचा माेठा फायदा हाेईल. सर्व वयाेगटातील लाेकांशी मैत्री करा. वयस्कर लाेक त्यांच्या अनुभवांमधून तुम्हाला उपाय सुचवतील तर तरुण पिढीच्या संगतीत तुम्हाला यश - अपयश आणि नवे विचार मिळतील.
स्वतःवर विश्वास ठेवा: ‘तुमच्या निर्णयाचे मूळ तुमच्या संस्कारांमध्ये असते. तुमच्या अपेक्षा वास्तविक ठेवा, तुमच्या संस्कारांचा आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाचा उपयाेग करा, निर्णय घ्या. गाेंधळलेली व्यक्ती माहितीच्या ओझ्याखाली दाबून जाते व बाहेरच्या विचारांच्या गाेंगाटाचाही त्याच्यावर परिणाम हाेताे,’ रसिका करकरे (सायकाॅलाॅजिस्ट) सांगत हाेत्या. दिवसभर तुम्ही किती जणांची मते ऐकता, मार्गदर्शनही घेता.सर्वात महत्वाचे आहे, तुमच्या क्षमतांवर असलेला तुमचा विश्वास व आत्मविश्वास. यांच्याच आधारे हाेते तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया.