वसुंधरा दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण

23 Apr 2025 15:20:24
 
 vas
लोणावळा, 22 एप्रिल (आ.प्र.) :
 
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून (22 एप्रिल) लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने गणपती मंदिर रोड, रायवूड येथील Auxillium Convent High School च्या मागे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माझी वसुंधरा शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे, कार्यालय अधीक्षक संतोष खाडे, स्वच्छता निरीक्षक ऐेशर्या काटकर, विजय लोणकर, जितेंद्र राऊत, शहर समन्वयक विवेक फडतरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0