‌‘दिलखुलास' कार्यक्रमात अजित पवार यांची मुलाखत

    12-Mar-2025
Total Views |
 
 dil
मुंबई, 11 मार्च (आ.प्र.) :
 
महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकास आता लांबणार नाही... असे सांगत शेती-शेतीपूरक क्षेत्रे, उद्योग-व्यापार, शिक्षण-आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकासाच्या सक्षमीकरणावर प्रामुख्याने भर देत विकसित भारत-विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प मांडला आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिलखुलास कार्यक्रमात सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र आणि दिलखुलास कार्यक्रमात अजित पवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत बुधवारी (12) आणि गुरुवारी (13 मार्च) आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, निवेदक संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.