जागतिक महिला दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सन्मान

    11-Mar-2025
Total Views |
 
jaa
 
पुणे, 10 मार्च (आ.प्र.) :
 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घरोघरी वृत्तपत्र वितरण करणाऱ्या महिलांचा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. खेडशिवापूर नजीक प्रथमेश रिसॉर्ट या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले. पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील घरोघरी वृत्तपत्र वितरण करणाऱ्या पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या महिला सभासदांचा व त्यांच्या परिवारातील महिलांचा सन्मान करण्यासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी नावीन्यपूर्व उपक्रम राबवून साधारणपणे 270 महिलांच्या सहलीचे आयोजन केले. प्रथमेश रिसॉर्ट या ठिकाणी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करून या वेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 
 jaa 
 
यामध्ये विजेत्या सविता अरुण निवंगुणे, श्रुती अवनकर, हेमा गुजर या महिलांना प्रथमेश रिसॉर्टच्या संचालिका पौर्णिमा निंबाळकर व तन्वी निंबाळकर यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. या वेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये प्रथम-आरती बोरकर, द्वितीय- नीलम हिरणवळे तृतीय-आदिती हिरणवळे, चतुर्थ-प्रतिमा माने, पाचवा- प्रियंका भिंगारे यांनी पटकावला. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा चोपडा यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक महिलांनी आपले वर्षानुर्षाचे या व्यवसायातील असलेले अनुभव भावुक होत सर्वांना सांगितले. तसेच माधवबागच्या वतीने डॉ. मिलिंद सरदार यांनी उपस्थित महिलांना आरोग्य कसे सुदृढ ठेवावे व महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले.
 
संघटनेचे सचिव अरुण निवंगुणे, उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, खजिनदार संदीप शिंदे, सहखजिनदार महादेव नेमाने, श्यामभाऊ धायगावे, विश्वस्त यशवंत वादवणे, संतोष मोहोळ, सोमनाथ शिर्के, संघटक संजय फाटक, कैलास नाकते, विभागप्रमुख दीपक निवंगुणे, चंदन कोऱ्हाळकर, संतोष जाधव, बबलू लोहार, गिरीश नगरकर, राहुल चिंचकर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सहलीचे आयोजन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते. महिला दिनानिमित्त अध्यक्ष विजय पारगे व प्रेस व्यवस्थापन, पदाधिकारीयांनी शुभेच्छा दिल्या. संघटनेचे सचिव अरुण निवंगुणे यांनी आभार मानले.
 
वृत्तपत्र संघटनेच्या परिवारातील महिलांच्या भावना लक्षात घेता या वर्षी नावीन्यपूर्व अशी कल्पना घेऊन संपूर्ण दिवस महिलांना मौज-मजा करता यावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही असेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील.
-विजय पारगे, (अध्यक्ष- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ)