निवांत माैन चांगले. एखाद्याचा सहवास आनंदी व्हावा म्हणून तुम्ही त्या व्यक्तीशी 24 तास बाेलतच बसले पाहिजे असे नव्हे.
=स्वावलंबी आणि एकटे राहणे याेग्य.तुम्ही प्रत्येक मिनीट कुणाच्या तरी सहवासातच असले पाहिजे असे नव्हे.
=नात्यासाठी तुमचा अजूनही संघर्ष चालू आहे हे इतरांना माहीत नसते.मग तुम्ही नात्यात असा किंवा नात्यात प्रवेश करणार असाल.
=स्वतःकडे लक्ष देण्याऐवजी नात्यावर लक्ष हे काही निकाेप मनाचे लक्षण नाही.
=विखारी लाेक इतरांसाठी देखील विखारी ठरतात. कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या लहरी देखील विखारी असतात. ते कितीही सद्हेतूने काम करत असले, तरी अशा व्यक्ती आपल्या भल्यासाठी वाईटच ठरतात. ते नेमके काय आहेत हे कधीच कळत नाही.
=तुम्हांला एखादी व्यक्ती आवडते हे त्या व्यक्तीला माहीत नसेल तर ती व्यक्ती दुसऱ्याबराेबर रिलेशनशिपमध्ये अडकली किंवा दुसऱ्यांशी बाेलू लागली तर मनाला त्रास करून घेऊ नका. तुम्ही थेटपणे तुमच्या मनातील त्या व्यक्तीला सांगितल्याखेरीज त्यांना काहीच माहिती हाेणार नाही.
=इतर लाेक तुम्हांला शिकवतील म्हणून गप्प आणि अंतर्मुखी राहू नका. तुम्हांला अनेक गाेष्टी माहिती नाहीत आणि तुम्ही अद्यापही शिकत आहात.
=स्वतःची काळजी घेणे याेग्य असते.स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थीपणा अजिबात नाही. हे ज्यांना समजत नाही त्यांनी तुमच्या आजूबाजूला थांबणे याेग्य नाही.
=हाडकुळे किंवा तसे दिसणे म्हणजे सुंदर किंवा निराेगीपणाचे लक्षण नव्हे.