घराच्या काॅर्नरमध्ये हवे हाेम ऑफिस

    08-Feb-2025
Total Views |
 
 

Office 
 
काेराेना संक्रमणाने आज घर, ऑफिस, वर्क कल्चर सारे काही बदलले आहे.यामुळे घरातही बदल पाहायला मिळत आहेत. डिस्टर्बन्सशिवाय ऑफिसवर्क हाेण्यासाठी नाॅइस प्रूफ आयसाेलेशन रूम तयार हाेत आहेत. घरात राहणे बाेअर हाेऊ नये यासाठी सिनेमा हाॅलचे सारे अ‍ॅम्बिएंस घरात क्रिएट करण्याची व्यवस्थाही हाेत आहे. यासाठी काेणी रूफ हाेम तयार करीत आहे तर काेणी ऑक्सीजन रिच हाेम तयार करण्यासाठी घरात हँगिंग गार्डन तयार करीत आहे. शहराच्या इंटीरियर डिझाइनर्सच्या मते 60% वर्किंग प्राेेशनल्सना घरात हाेम ऑफिस सेटअप ताेडाेडीशिवाय हवा आहेत तर 50% फॅमिलीज घराच्या टेरेसवर पर्सनलाइज्ड हाेम थिएटर बनवण्याची डिमांड करीत आहेत.
 
ताेडाेडीशिवाय ऑफिस : इंटीरियर डिझायनर केनी ओबेराॅय यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षांत 25पेक्षा जास्त हाेम ऑफिस बनवली आहेत. लाेकांना घरात ताेडाेडीशिवाय असे काॅर्नर बनवून दिले जावेत जिथे गाेंगाट पाेहाेचणार नाही व अँम्बिएंसही देता येईल.
 
स्पेस सेव्हिंग आणि कमी रिसाेर्सम ध्ये ऑफिस : इंटीरियर प्राॅडक्ट मॅन्युफॅक्चर जगजीत सिंह सांगतात की, हाेम ऑफिसलाब्लाइंड्सनेही क्रिएट करता येऊ शकते.ब्लाइंडने असे नाॅइसप्रूफ पार्टिशन तयार हाेते की आपण त्यात आरामात ऑफिसवर्क करू शकता. महिन्यात 35 ते40 जण अशा प्रकारची ब्लाइंड्स आणि कर्टनसाठी चाैकशी करतात.
 
फॅमिलीसाेबत एंजाॅय : हाेम थिएटर स्पेसलिस्ट मनाेज सुराना म्हणतात, आता अनेक लाेक हाेम थिएटर क्रिएट करवून घेत आहेत. विशेषत: ज्यांचे रूफ रिकामे असते त्यांना येथे काही असे क्रिएट करावे जेणेकरून फॅमिलीचा ुल एंटरटेनमेंट झाेन म्हणता येईल.