आयुष्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या काही छाेट्या सवयी

    07-Feb-2025
Total Views |
 

Health 
 
राेज सकाळी घराच्या बाहेर पडा आणि किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात फिरा. त्यातून मग तुमचा दिवसभराच्या मूळ चांगल्या पद्धतीने सुधारलेला असताे.रात्री झाेपण्यापूर्वी दहा मिनिटे वेळ काढा आणि आजच्या दिवसात कुठल्या चांगल्या गाेष्टी झाल्या आणि त्या अधिक चांगल्या कशा प्रकारे करता आल्या असत्या याचे विश्लेषण करा.जेव्हा तुम्हाला अवघड निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा थाेडे थांबा. एखादी माेठी वस्तू खरेदी करायची असते तेव्हा 24 तास थांबा आणि विचार करा की खराेखरच त्या वस्तूची तुम्हाला गरज आहे का आणि गरज असल्याची खात्री पटली तरच ती वस्तू खरेदी करा. अन्यथा खरेदी करू नका.
 
दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन करा. श्नयताे काेमट पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीराची सकाळची पाण्याची गरज भागते आणि तुमच्या चयापचय क्रियेला चालना मिळते.एक महिनाभर तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवा. मग तुमच्या लक्षात येईल, की तुमचा पैसा कुठे जाताे आणि तुम्ही अधिक प्रभावीपणे बचत कशी करू शकता. राेज रात्री दिवसभरातील तुम्हाला आनंद देणाऱ्या किंवा चांगल्या वाटलेल्या तीन गाेष्टी लिहून काढा. त्यातून मग तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गाेष्टींची जाणीव हाेत राहील.राेज सकाळी उठल्यावर पाच मिनिटांचा वेळ काढा आणि ध्यानधारणा करा. त्यामुळे तुम्हाला रिलॅ्नस वाटेल आणि तुमचे मन तणावमुक्त हाेण्यास मदत हाेईल.
 
तुम्हाला एखादी गाेष्ट माहीत नसेल तर मला माहित नाही, असे म्हणण्यापेक्षा मी माहीत करून घेताे किंवा मी शाेधताे असे स्वतःला सांगा. त्यातून तुमच्यातील कुतूहल आणि शिकण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळते.राेज एका तरी व्यक्तीचे काैतुक करण्याची सवय लावून घ्या. राेज सकारात्मकता पसरवण्यातून इतरांबराेबरील तुमची नाती अधिक बळकट हाेतात. तुमच्या मनात एखादी कल्पना आली तर त्यावर पाच सेकंदात काम करायला सुरुवात करा.म्हणजे त्या कल्पनेवर तुम्ही अतिविचार करत नाही आणि अति विचारातून संधी गमावण्याचा धाेका जास्त असताे ताे टाळता येताे.