डायनिंग टेबलचे मॅनर्स पाळा

    06-Feb-2025
Total Views |
 
 

Table 
 
खाणे सुरू करण्यापूर्वी टेबलावर सगळे पदार्थ सर्व्ह झाले आहेत की नाही हे बघून घ्यावे. टेबलावर बसलेल्या सर्वच लाेकांना पदार्थ सर्व्ह झाल्यानंतरच खाण्यास सुरुवात करावी.खातेवेळी ताेंडातून मचमच आवाज निघणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्न हळू-हळू, चावून-चावून खावे.खातेवेळी जर मधेच उठावे लागले तर, ‘माफ करा हं!’ बाेलून उठावे. नॅपकिन खुर्चीवरच ठेवावा.टेबलावर पदार्थ, ज्यूसवा काेल्डड्रिंक सांडले तर त्वरित पुसून साफ करून घ्यावे. जर कपड्यांवर खाद्यपदार्थ सांडले तर आरडा-ओरडा करण्याऐवजी आधी नॅपकिन आणि नंतर वाॅशरूममध्ये जाऊन ते साफ करावेत. इतर काेणावर जर आपल्याकडून काही सांडले गेले तर लगेच माफी मागून वेटरला बाेलावून साफ करावे.
 
साेबत जेवणारे सारे लाेक टेबलावर बसल्यानंतरच नॅपकिन खाेलावा.नॅपकिन नेहमीच स्वतःच्या मांडीवर ठेवूनच खाेलावा. खातेवेळी पदार्थातील एखादा कडक पदार्थ चावला जात नसेल तर ताे मुखातून चमच्यातच बाहेर काढून एका प्लेटमध्ये काेपऱ्यात ठेवावा.सुरी-काट्याचा वापर करायचा असेल तर त्यांच्या वापरण्याची याेग्य ती पध्दत आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.एकाच वेळी दाेन-तीन बाइटपेक्षा जास्त खाऊ नये. छाेटे-छाेटे तुकडे करून खावेत.प्रत्येक काेर्ससाेबत वापरण्यात आलेले सुरी-काटे-चमचे प्लेटमध्येच राहू द्यावे.उष्टे चमचे टेबल-क्लाॅथवर ठेवू नये.